Video : श्रीलंका दौऱ्यापूर्वी कुलदीप यादव याची बागेश्वर धाममध्ये हजेरी, धीरेंद्र शास्त्री यांचा आशीर्वाद घेतला

टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर असून वनडे संघात कुलदीप याची वर्णी लागली आहे. श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी कुलदीप यादवने बागेश्वर धाममध्ये हजेरी लावली आणि धीरेंद्र शास्त्री यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी कुलदीप यादवच्या नावाने चिटोरा काढला नाही.

Video : श्रीलंका दौऱ्यापूर्वी कुलदीप यादव याची बागेश्वर धाममध्ये हजेरी, धीरेंद्र शास्त्री यांचा आशीर्वाद  घेतला
| Updated on: Jul 23, 2024 | 7:17 PM

टी20 वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता टीम इंडियाच्या खेळाडूंनी बऱ्यापैकी आराम केल्यानंतर पुढचा प्रवास सुरु केला आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी संघही जाहीर झाला आहे. काही जणांची वर्णी टी20 संघात, तर काही जणांना वनडे संघात स्थान मिळालं आहे. चायनामन गोलंदाजीने प्रसिद्ध असलेल्या कुलदीप यादवला वनडे संघात मिळालं आहे. मात्र या दौऱ्यापूर्वी कुलदीप यादवने बागेश्वर धाम येथे हजेरी लावली. कुलदीप यादव आपल्या कुटुंबियांसह बागेश्वर धाम येथे पोहोचला. कुलदीप यादवचा बागेश्वर धाम येथील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो बागेश्वर धाम सरकारला नमन करताना आणि आशीर्वाद घेताना दिसत आहे.गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बागेश्वर धाममध्ये 18 जुलै ते 22 जुलै या कालावधीत एका विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कुलदीप यादव याने आपल्या संपूर्ण कुटुंबासह हजेरी लावली.

कुलदीप यादव बागेश्वर धाममध्ये दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्याची धीरेंद्र शास्त्रीसोबतची छायाचित्रे समोर आली आहेत. कुलदीप यादव बागेश्वर धाम सरकारवरचा विश्वास किती अतूट आहे हे यावरून दिसून येते. कुलदीप यादव मंचावर काही काळ बसला. मात्र त्याच्या नावाने कोणताही चिटोरा काढण्यात आला नाही. कुलदीप यादवने आपल्या कुटुंबासह धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना आपले गुरू बनवले असल्याची चर्चा रंगली आहे.

टी20 विश्वचषकात  वर्ल्डकप स्पर्धेत कुलदीप यादवने चमकदार कामगिरी केली. साखळी फेरीत त्याला संधी मिळाली नाही. मात्र सुपर 8 फेरीत त्याने कमाल केली. उपांत्य फेरीत इंग्लंडची दाणादाण उडवून दिली. त्याने पाच सामने खेळले आणि 6.95 च्या इकॉनॉमीने 10 विकेट घेतल्या. त्याने भारतासाठी आतापर्यंत 12 कसोटी, 103 एकदिवसीय आणि 40 टी-20 सामने खेळले आहेत. तिन्ही फॉरमॅट्ससह त्याने जवळपास 300 विकेट्स घेतल्या आहेत.

टीम इंडिया वनडे संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलिल अहमद, हार्षित राणा.