AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Legends League : इंडियन महाराजाला ख्रिस गेलच्या बॅटचा तडाखा, 9 फोर, 1 SIX, जाम धुतलं

Legends League : इंडियन महाराजाकडून कोण खेळलं?. जायंट्सचा 2 सामन्यातील हा पहिला विजय आहे. ते तिसऱ्या स्थानावर आहेत. इंडियन महाराजा दुसऱ्या स्थानावर आहे. एशिया लायन्स पहिल्या स्थानावर आहे.

Legends League : इंडियन महाराजाला ख्रिस गेलच्या बॅटचा तडाखा, 9 फोर, 1 SIX, जाम धुतलं
chris gayleImage Credit source: PTI
| Updated on: Mar 16, 2023 | 11:27 AM
Share

Legends League Cricket : सध्या वूमेन्स प्रीमियर लीग आणि पाकिस्तान सुपर लीगची चर्चा आहे. दोन्ही टुर्नामेंट्समध्ये सरस क्रिकेट पहायला मिळतय. त्याचवेळी माजी खेळाडूंच्या लेजेंड्स लीग क्रिकेटमुळे सुद्धा प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन होतय. असाच एक सामना सुरेश रैना, हरभजन सिंग यांच्या इंडियन महाराजाचा ख्रिस गेल, एरॉन फिंच यांच्या वर्ल्ड जायंट्स बरोबर झाला. यात जायंट्सच्या टीमने विजय मिळवला. इंडियन महाराजाकडून विजयासाठी 140 धावांच टार्गेट मिळालं होतं.

या 140 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वर्ल्ड जायंट्सकडून ख्रिस गेलने आक्रमक बॅटिंग केली. त्याने 57 धावा करुन टीमच्या विजयाचा पाया रचला. गेलने आपल्या इनिंगमध्ये 9 चौकार आणि 1 षटकार मारला.

गेलची विकेट कोणी काढली?

गेलने या दरम्यान शेन वॉट्सनसोबत 51 धावांची भागीदारी केली. ख्रिस गेल 15 व्या ओव्हरमध्ये सुरेश रैनाच्या चेंडूवर आऊट झाला. त्यावेळी जायंट्सची धावसंख्या 125 धावा होती. 18.4 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून जायंट्सने मॅच जिंकली. जायंट्सचा 2 सामन्यातील हा पहिला विजय आहे. ते तिसऱ्या स्थानावर आहेत. इंडियन महाराजा दुसऱ्या स्थानावर आहे. एशिया लायन्स पहिल्या स्थानावर आहे.

इंडियन महाराजाकडून कोणी जास्त धावा केल्या?

इंडियन महाराजाने 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून 139 धावा केल्या. इंडियन टीमकडून सुरेश रैनाने सर्वाधिक 49 धावा केल्या. पण तो अर्धशतक पूर्ण करु शकला नाही. त्याने 41 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकार लगावले. रैनाशिवाय इरफान पठानने 20 चेंडूत वेगाने 25 धावा केल्या. यात 2 सिक्स आणि 1 फोर आहे. मनविंदर बिसलाने 34 चेंडूत 36 धावा केल्या. त्याशिवाय महाराजाचा दुसरा कुठलाही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?