LLC Final 2023 : एशिया लायन्सने पटकावलं विजेतेपद, जावयानंतर आता सासऱ्याच्याही शिरपेचात मानाचा तुरा

| Updated on: Mar 21, 2023 | 12:45 AM

एशिया लायन्सने लीजेंड्स लीग क्रिकेटच्या (LLC 2023) विजेतेपदावर नाव कोरलं आहे. उपुल थरंगा आणि तिलकरत्ने दिलशान यांच्या अर्धशतकांच्या जोरावर हा विजय मिळवला. 

LLC Final 2023 : एशिया लायन्सने पटकावलं विजेतेपद, जावयानंतर आता सासऱ्याच्याही शिरपेचात मानाचा तुरा
Follow us on

मुंंबई : एशिया लायन्सने लीजेंड्स लीग क्रिकेटच्या (LLC 2023) विजेतेपदावर नाव कोरलं आहे. फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या वर्ल्ड जायंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स गमावत 147 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना एशिया लायन्स संघाने 17 व्या ओव्हरमध्येच हे लक्ष्य पूर्ण केलं. उपुल थरंगा आणि तिलकरत्ने दिलशान यांच्या अर्धशतकांच्या जोरावर हा विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या वर्ल्ड जायंट्स संघाची सुरूवात खराब झाली. मॉर्न व्हॅन विक 0 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेल्या  कर्णधार शेन वॉटसनलाही भोपळा फोडता आला नाही. रझ्झाकने दोघांनाही संघाच्या तिसऱ्या षटकात बाद करत जबरदस्त धक्के दिले. दोन विकेट गेल्या नाहीतर सलामीवर सिमन्स 9 धावांवर धावबाद झाला.

वर्ल्ड जायंट्स संघ अडचणीत सापडला होता, त्यावेळी जॅक कॅलिसने सामन्याची सुत्र आपल्या हातात घेतली. जॅक कॅलिसने 54 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 78 धावा केल्या,  यामध्ये त्याने 3 षटकार आणि 5 चौकार मारले तर रॉस टेलरने 32 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. 20 षटकानंतर वर्ल्ड जायंट्स संघाने 147 धावांचा डोंगर उभारला.

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या एशिया लायन्स संघाचे सलामीवीर उपुल थरंगा आणि तिलकरत्ने दिलशानने अनुक्रमे 57 धावा आणि 58 धावा करत विजयाचा पाया रचला. 115 धावांची सलामी देत अर्धी मोहिम दोघांनीच फत्ते केली होती. थरंगाने 5 चौकार आणि 3 षटकार मारले तर दिलशान याने 8 चौकार मारले.

दोघे बाद झाल्यावर मोहम्मद हाफिज नाबाद 9 धावा आणि मिसबाह नाबाद 9 धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.  फायनल सामन्यामध्ये अब्दुल रझ्झाक याला ‘सामनावीर’ आणि  उपुल थरंगाला ‘मालिकावीर’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.