AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs KKR: आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, अंगकृष रघुवंशीला ‘OBS’ पद्धतीने दिलं आऊट

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्स आमनेसामने आले आहेत. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या अंगकृष रघुवंशीची विकेट चर्चेत आली आहे. कारण आयपीएलच्या इतिहासात अशी विकेट पहिल्यांदाच दिली गेली.

LSG vs KKR: आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, अंगकृष रघुवंशीला 'OBS' पद्धतीने दिलं आऊट
LSG vs KKR: आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, अंगकृष रघुवंशीला 'OBS' पद्धतीने केलं आऊट Image Credit source: Twitter
| Updated on: Apr 26, 2026 | 8:38 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 38व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्याने कोलकाता नाइट रायडर्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. कोलकात्याची सुरूवात काही चांगली झाली नाही. अजिंक्य रहाणे आणि टिम सैफर्ट स्वस्तात बाद झाले. अवघ्या 16 धावांवर दोन विकेट पडल्याने संघावर दडपण वाढलं. अंगकृष रघुवंशी आणि कॅमरून ग्रीन यांच्यावर जबाबदारी आली होती. या जोडीकडून केकेआरच्या चाहत्यांना फार अपेक्षा होती. या दोघांनी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण 27 धावांवर असताना अघटीत घडलं. अंगकृष 8 चेंडू खेळून 9 धावांवर होता आणि त्याला क्षेत्ररक्षणात अडथळा निर्माण केल्याने बाद दिलं गेलं. आयपीएलच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. त्याला अशा पद्धतीने बाद दिल्याने केकेआरच्या स्टाफने नाराजी व्यक्त केली. अभिषेक नायर यांनी चौथ्या पंचांसोबत वाद घातला. पण त्याला बाद दिल्याने मैदान सोडण्याशिवाय पर्याय नव्हता.

आयपीएल स्पर्धेच्या या सामन्यात लखनौकडून पाचवं षटक टाकण्यासाठी प्रिन्स यादव आला होता. या षटकातील शेवटच्या चेंडूवर अंगकृष रघुवंशीला स्ट्राईक मिळाली होती. त्याने प्रिंस यादवचा चेंडू मिड ऑनच्या दिशेने मारला आणि धाव घेण्यासाठी पुढे गेला. पण नॉन स्ट्राईकला असलेल्या कॅमरून ग्रीनने त्याला नकार दिला. त्यामुळे अर्ध्यातून परत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. स्ट्राईकला परत जाताना त्याने उडी मारली. पण परत असताना त्याच्या अंगाला चेंडू लागला आणि अडला. त्यानंतर मोहम्मद शमीने अपील केली. त्यामुळे मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांकडे या अपीलसाठी दाद मागितली. त्याची कृती रिप्लेत पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचांना त्याने धावताना दिशा बदलल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्यांनी अंगकृषला बाद दिलं. त्यामुळे त्याही धक्का बसला. अशा पद्धतीने बाद दिल्याने केकेआरच्या संघाने नाराजी व्यक्त केली.

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विकेट झटपट पडल्याने दबाव वाढला आहे. त्याचा थेट परिणाम धावगतीवर झाला. पावरप्लेच्या सहा षटकात 3 गडी गमवून 31 धावा करता आल्या. निर्णयानंतर रघुवंशी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्याच्या कृतीने संतापल्याचं स्पष्ट दिसून आलं. त्याने आपले हेल्मेट फेकून दिले आणि सीमारेषेवर बॅटही फिरवली. अंगकृष रघुवंशीचा डाव 9 धावांवर संपुष्टात आला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...