ब्रायन लारा कर्णधार, तर सचिन तेंडुलकर आऊट! मॅथ्यू हेडेनने 21व्या शतकातील टेस्ट प्लेइंग 11 केली जाहीर

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडेनने 21 व्या शतकातील बेस्ट प्लेइंग 11 जाहीर केली आहे. या संघाचं कर्णधार ब्रायन लाराकडे सोपवलं आहे. मात्र या संघात दिग्गज क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर नसल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. चला जाणून कोणते 11 खेळाडूंना संधी मिळाली ती...

ब्रायन लारा कर्णधार, तर सचिन तेंडुलकर आऊट! मॅथ्यू हेडेनने 21व्या शतकातील टेस्ट प्लेइंग 11 केली जाहीर
सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा
Image Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Jun 15, 2025 | 8:12 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच चौथं पर्व सुरु होणार आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. असं सर्व असताना ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने 21व्या शतकातील टेस्ट प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. पण आश्चर्याचा बाब म्हणजे या संघात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सचिन तेंडुलकरचा समावेश नाही. इतकं काय तर मॅथ्यू हेडनने सचिनला वगळून संघात विराट कोहली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणला सहभागी केलं आहे. इतकंच काय तर या संघाची धुरा वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ब्रायन लाराच्या हाती सोपवली आहे. हेडेनने निवडलेल्या संघआत तीन वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूचा समावेश आहे. मॅथ्यू हेडेनने निवडलेल्या संघात पाकिस्तान, श्रीलंका आणि न्यूझीलंडचा एकही खेळाडू नाही. श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यालाही संधी दिलेली नाही.

हेडनने निवडलेल्या संघात वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेचा खेळाडू आहे.ऑस्ट्रेलियाचे पाच खेळाडू, इंग्लंड आणि भारताचे प्रत्येकी दोन खेळाडू, तर वेस्ट इंडिज-दक्षिण अफ्रिकेचा प्रत्येकी एक खेळाडू आहेत. हेडेनने निवडलेल्या संघात सलामीला इंग्लंडचा एलिस्टर कुक आणि डेविड वॉर्नर येईल. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी दक्षिण अफ्रिकेच्या जॅक कॅलिसला पसंती दिली आहे. चौथ्या क्रमांकावर कसोटीतून नुकताच निवृत्त झालेला विराट कोहली असेल. पाचव्या स्थानावर व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मणला संधी दिली आहे. विकेटकीपर फलंदाज म्हणून एडम गिलख्रिस्टची निवड केली आहे. फिरकीची जबाबदारी शेन वॉर्नकडे दिली आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून पॅट कमिन्स, ब्रेट ली आणि जेम्स अँडरसन यांचा समावेश केला आहे.

मॅथ्यू हेडेनने निवडलेली 21व्या शतकातील कसोटी प्लेइंग 11

एलिस्टर कुक, डेविड वार्नर, जॅक कॅलिस, ब्रायन लारा (कर्णधार), विराट कोहली, व्हीव्हीएस लक्ष्मण, एडम गिलख्रिस्ट (विकेटकीपर), शेन वॉर्न, पॅट कमिंस, ब्रेट ली, जेम्स अँडरसन.