AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : ऑलराउंडरसह ओपनर 19 व्या मोसमातून आऊट, मुंबई टीममधून 2 खेळाडू अचानक बाहेर, कारण?

Mumbai Indians IPL 2026 : मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 स्पर्धेत आपल्या मोहिमेतील 13 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळणार आहे. त्याआधी मुंबई टीममधून 2 खेळाडूंना मुक्त करण्यात आलं आहे. जाणून घ्या कारण.

IPL 2026 : ऑलराउंडरसह ओपनर 19 व्या मोसमातून आऊट, मुंबई टीममधून 2 खेळाडू अचानक बाहेर, कारण?
Mumbai Indians Huddle Talk IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: May 19, 2026 | 9:31 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील मुंबई इंडियन्स सर्वात यशस्वी टीम आहे. मात्र मुंबई इंडियन्सचं 19 व्या मोसमातील (IPL 2026) आव्हान हे साखळी फेरीतच संपुष्ठात आलं. मुंबई या हंगामातून बाहेर होणारी दुसरी टीम ठरली. त्यामुळे आता मुंबईचं या हंगामातील उर्वरित सामने जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. मुंबईकडे आता गमावण्यासारखं काहीच नाही. मात्र त्यानंतरही मुंबईला मोठा झटका लागला आहे. मुंबईचे 2 खेळाडू हे उर्वरित हंगामातून बाहेर झाले आहेत. मुंबई इंडियन्सकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

मुंबईचे 2 खेळाडू आऊट

मुंबईचा ओपनर क्विंटन डी कॉक आणि ऑलराउंडर राज अंगद बावा हे दोघे उर्वरित 2 सामन्यांतून बाहेर झाले आहेत. क्विंटन आणि राज या दोघांना दुखापतीमुळे मुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे हे दोघे आता दुखापतीतून कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या दोन्ही खेळाडूंना 19 व्या मोसमात फार संधी मिळाली नाही. क्विंटन आणि राज या दोघांना प्रत्येकी 3-3 सामन्यांत खेळण्याची संधी देण्यात आली.

क्विंटनची कामगिरी

क्विंटन डी कॉक याला मुंबईने त्याच्या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं होतं. मुंबईने क्विंटनसाठी 2 कोटी रुपये मोजले होते. क्विंटनने या हंगामातील 3 सामन्यांत एकूण 132 धावा केल्या. क्विंटनने या दरम्यान 1 शतक झळकावलं. विशेष म्हणजे क्विंटनने या हंगामात त्याच्या पहिल्याच सामन्यात शतक केलेलं. मात्र क्विंटनला 3 सामन्यानंतर संधी देण्यात आली नाही. टीम मॅनेजमेंटने क्विंटनच्या जागी रायन रिकेल्टन याला संधी दिली. रिकेल्टनने या मोसमात आतापर्यंत 10 सामन्यांत 430 धावा केल्यात.

तसेच राज बावा याने 3 सामन्यांत 3 विकेट्स मिळवल्या. तसेच राजला फक्त एकाच डावात बॅटिंगची संधी मिळाली. राजने या 1 डावात 16 धावा केल्या.

मुंबईचे उर्वरित 2 सामने केव्हा?

मुंबईला या मोहिमेत आपले आणखी 2 सामने खेळायचे आहेत. मुंबई आपला शेवटून दुसरा सामना हा 20 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. तर मुंबईसमोर शेवटच्या सामन्यात 24 मे रोजी राजस्थान रॉयल्सचं आव्हान असणार आहे.

मुंबईची कामगिरी

दरम्यान मुंबई इंडियन्स टीमने आतापर्यंत 12 पैकी 4 सामने जिंकले आहेत. मुंबई 8 गुणांसह नवव्या स्थानी आहे. त्यामुळे मुंबई उर्वरित 2 सामन्यांत कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...