AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs KKR : अजिंक्य रहाणेची जबरदस्त सुरुवात, लोकल बॉयचं पलटण विरुद्ध चाबूक अर्धशतक

Ajinkya Rahane Fifty : केकेआरचा कॅप्टन अजिंक्य रहाणे याने मुंबई इंडियन्स विरुद्ध अर्धशतक झळकावलं. अजिंक्य केकेआरसाठी 19 व्या मोसमात अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला.

MI vs KKR : अजिंक्य रहाणेची जबरदस्त सुरुवात, लोकल बॉयचं पलटण विरुद्ध चाबूक अर्धशतक
Ajinkya Rahane KKR vs MI IPL 2026Image Credit source: IPL X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 29, 2026 | 11:00 PM
Share

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमात जबरदस्त अशी सुरुवात केली आहे. रहाणेने या मोहिमेतील आपल्या पहिल्याच सामन्यात तसेच घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये माजी संघाविरुद्ध चाबूक अर्धशतक झळकावलं आहे. लोकल बॉय अजिंक्यने वानखेडे स्टेडियममध्ये मुबई इंडियन्स विरुद्ध अर्धशतक ठोकून आपण फॉर्मेटनुसार खेळू शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं आहे. अजिंक्य टी 20 फॉर्मेटनुसार वेगाने खेळू शकत नाही, असं म्हणत त्याच्या क्षमतेवर काही दिवसांपूर्वी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र रहाणेने दणदणीत खेळी करुन टीकाकाराना चोख उत्तर दिलंय.

अजिंक्य रहाणे याचं चाबूक अर्धशतक

मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने टॉस जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला बॅटिंग करण्यासाठी भाग पाडलं. केकेआरच्या अजिंक्य रहाणे आणि फिन एलन या सलामी जोडीने पहिले बॅटिंग करण्याच्या संधीचा पूर्ण फायदा घेतला. अजिंक्य आणि फिन या दोघांनी 69 धावांची जबरदस्त सलामी भागीदारी केली. केकेआरने फिनच्या रुपात पहिली विकेट गमावली. फिनने 37 धावा केल्या. त्यानंतर कॅमरुन ग्रीन याच्या रुपात केकेआरने दुसरी विकेट गमावली. ग्रीनने 18 धावांचं योगदान दिलं. ग्रीनला मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र त्याने निराशा केली.

केकेआरने अप्रतिम सुरुवातीनंतर 2 विकेट्स गमावले. मात्र रहाणेने एक बाजू लावून धरली. रहाणेने या दरम्यान 10 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर अर्धशतक पूर्ण केलं. रहाणेने 27 बॉलमध्ये 188.89 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक झळकावलं. अजिंक्यचं 19 व्या पर्वातील पहिलं, मुंबई विरुद्धचं सहावं आणि एकूण 34 वं अर्धशतक ठरलं. अजिंक्यने या खेळीदरम्यान 4 षटकार आणि 3 चौकार लगावले.

अजिंक्यचा अर्धशतकी तडाखा

अजिंक्यच्या पहिल्या सामन्यात किती धावा?

अजिंक्य अर्धशतकानंतर हा तडाखा असाच कायम ठेवत चौफेर फटकेबाजी करत होता. त्यामुळे अजिंक्यला शतकाची संधी होती. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळणाऱ्या सहकारी शार्दुल ठाकुर याने अजिंक्यचा गेम केला. शार्दुलने अजिंक्यला 14 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर कॅप्टन हार्दिक पंड्या याच्या हाती कॅच आऊट केलं. अजिंक्यने 40 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरसह एकूण 67 धावा केल्या. अजिंक्यने 167.50 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा