AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs KKR Toss : मुंबईने टॉस जिंकला, केकेआर विरुद्ध बॉलिंग, सूर्याला डच्चू, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण कोण?

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Toss : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध टॉस जिंकून चेजिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा पलटणच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण कोण?

MI vs KKR Toss : मुंबईने टॉस जिंकला, केकेआर विरुद्ध बॉलिंग, सूर्याला डच्चू, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण कोण?
Hardik Panya and Ajinkya Rahane MI vs KKR TossImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 29, 2026 | 8:12 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वातील दुसऱ्या सामन्यात आज रविवारी 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. तर लोकल बॉय अजिंक्य रहाणे याच्याकडे केकेआरच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला आहे. मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन हार्दिकने फिल्डिंगचा निर्णय घेत केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

मुंबई या सामन्यासाठी 6 फलंदाज आणि 5 गोलंदाजांसह मैदानात उतरल्याचं कर्णधार हार्दिक पंड्या याने टॉसनंतर सांगितलं. तसेच आम्हीही टॉस जिंकून बॉलिंग करण्याचाच निर्णय घेतला असता, असं केकेआरचा कॅप्टन अजिंक्य रहाणे याने टॉसनंतर प्रेंझेटेटर रवी शास्त्री यांच्यासोबत बोलताना म्हटलं. तसेच दोन्ही कर्णधारांनी खेळपट्टीवर गवत फार जास्त प्रमाणात असल्याचं निरीक्षण नोंदवलं. त्यामुळे वानखेडेत कोण विजेता ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पलटण वानखेडेत केकेआर विरुद्ध 11 वा सामना जिंकणार?

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील वानखेडे स्टेडियममध्ये होत असलेला हा 13 वा सामना आहे. मुंबईने 12 पैकी 10 सामने जिंकले आहेत. तर केकेआरला वानखेडेत मुंबई विरुद्ध 2 सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे आता पलटण 11 वा सामना जिंकणार की केकेआर तिसऱ्या विजयाची नोंद करणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

तसेच उभयसंघातील हा 36 वा सामना आहे. मुंबईने आतापर्यंत कोलकाता विरुद्ध या 35 पैकी सर्वात जास्त सामने जिंकले आहेत. मुंबईने 35 पैकी 24 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर कोलकाताने 11 सामन्यांमध्ये पलटवार करत मुंबईवर मात केली आहे. अशात आता मुंबई आणि केकेआरपैकी कोण विजयी सलामी देण्यात यशस्वी ठरतो? हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल.

क्वींटन डी कॉकला डच्चू, सूर्या इम्पॅक्ट प्लेअर

केकेआर विरूद्धच्या सामन्यासाठी क्विंटन डी कॉक याला मुंबईच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आलेली नाही. तर सूर्यकुमार यादव याचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून समावेश करण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, नमन धीर, शार्दुल ठाकूर, मयंक मार्कंडे, एएम गझनफर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.

केकेआर प्लेइंग ईलेव्हन : फिन एलन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), कॅमेरुन ग्रीन, अंगकृष रघुवंशी (विकेटकीपर), रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा आणि ब्लेसिंग मुजराबानी

Follow Us