MI vs KKR Live Score Updates and Highlights, IPL 2026 : मुंबई इंडियन्सचा 14 वर्षांचा वनवास संपला, पहिल्या सामन्यात दणदणीत विजय
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Indian Premier League Score and Highlights In Marathi: आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने विजयी सलामी दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला नकोसा ठपका अखेर पुसून काढला आहे. मुंबई इंडियन्सने 2013 पासून 2025 पर्यंत आयपीएलमधील पहिला सामना गमावला होता. पण यावेळी तसं झालं नाही.

मुंबई इंडियन्सने 2012 नंतर पहिला सामना कधीच जिंकला नव्हता. त्यामुळे गेल्या काही वर्षात मुंबई इंडियन्स पहिला सामना गमावते असा ठप्पा लागला होता. पण यावेळी मुंबई इंडियन्सने यावेळी सर्व काही पुसून टाकलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने विजयासाठी 221 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान मुंबई इंडियन्सने 19.1 षटकात फक्त 4 गडी गमवून पूर्ण केलं. यासह स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. कोलकाता नाईट रायडर्स संघ या सामन्यात गोलंदाजीत पूर्णपणे फेल गेला.
LIVE Cricket Score & Updates
-
MI vs KKR IPL 2026 Live Score : मुंबई इंडियन्सचा 14 वर्षांचा वनवास संपला, पहिल्या सामन्यात दणदणीत विजय
मुंबई इंडियन्सचा पहिल्या सामन्यात पराभवाचा 14 वर्षांचा वनवास अखेर संपला आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 6 गडी राखून पराभूत केलं. कोलकाता नाईट रायडर्सने विजयासाठी 221 धावांचं आव्हान दिलं होतं. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नमन धीरने चौकार मारला आणि मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्स आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 221 धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.
-
MI vs KKR IPL 2026 Live Score : मुंबई इंडियन्सला चौथा धक्का, तिलक वर्मा बाद
मुंबई इंडियन्सला तिलक वर्माच्या रुपाने चौथा धक्का बसला. तिलक वर्मा 14 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. विजयी षटकार मारण्याच्या नादात झेल बाद झाला आणि तंबूत परतला.
-
-
MI vs KKR IPL 2026 Live Score : मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का, रिकल्टन धावचीत
मुंबई इंडियन्सला रायन रिकल्टनच्या रूपाने तिसरा धक्का बसला. दुसरी धाव घेण्याच्या नादात धावचीत झाला. 43 चेंडूत 8 षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने 81 धावा करून बाद झाला. अनुकूल रॉयने जबरदस्त थ्रो करत त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
-
MI vs KKR IPL 2026 Live Score : मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का, सूर्यकुमार यादव बाद
मुंबई इंडियन्सला सूर्यकुमार यादवच्या रूपाने दुसरा धक्का बसला आहे. सूर्यकुमार यादव 8 चेंडूत 16 धावा करून बाद झाला आहे. त्याने या खेळीत 3 चौकार मारले. कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या नादात सीमेवर रिंकु सिंहने अप्रतिम झेल पकडलं.
-
MI vs KKR IPL 2026 Live Score : रोहित शर्मा आऊट, मुंबईला पहिला झटका
केकेआरने मुंबईला मोठा झटका दिला आहे. वैभव अरोरा याने रोहित शर्माला अनुकूल रॉय याच्या हाती कॅच आऊट केल. रोहितने 38 बॉलमध्ये 78 धावा केल्या.
-
MI vs KKR IPL 2026 Live Score : मुंबईच्या सलामी जोडीचा धमाका, रोहितनंतर रायनची अर्धशतकी खेळी
रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीने मुंबईला जबरजस्त सुरुवात मिळवून दिली आहे. रोहितनंतर रायन रिकेल्टन यानेही अर्धशतक झळकावलं आहे. मुंबईने 9 ओव्हरमध्ये बिनबाद 110 धावा केल्या आहेत. रोहित 59 आणि रायन 50 धावांवर नाबाद खेळत आहे.
-
MI vs KKR IPL 2026 Live Score : रोहितचं अर्धशतक, मुंबईची पावरप्लेमध्ये धमाकेदार बॅटिंग
मुंबई इंडियन्सने पावरप्लेमध्ये धमाकेदार बॅटिंग केलीय. मुंबईने 1 विकेट गमावून 80 धावा केल्या. मुंबईसाठी रोहित शर्मा याने नाबाद 50 धावा केल्या आहेत. तर रायन रिकेल्टन 28 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे.
-
MI vs KKR IPL 2026 Live Score : पलटणची आक्रमक सुरुवात, रोहित-रायन सलामी जोडीची फटकेबाजी
मुंबईच्या सलामी जोडीने 221 धावांचा पाठलाग करताना धमाकेदार सुरुवात केली आहे. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीने 4 ओव्हरमध्ये 49 धावा जोडल्या आहेत. रोहित शर्मा 20 आणि रायन रिकेल्टन 28 धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
MI vs KKR IPL 2026 Live Score : मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात, रोहित-रायन सलामी जोडी मैदानात
मुंबई इंडियन्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. मुंबईकडून रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन ही सलामी जोडी मैदानात आली आहे. केकेआरने मुंबईसमोर 221 धावांचं विक्रमी आव्हान ठेवलं आहे.
-
MI vs KKR IPL 2026 Live Score : केकेआरची जबरदस्त बॅटिंग, मुंबईसमोर 221 धावांचं आव्हान
कोलकाता नाईट रायडर्सने 19 व्या मोसमातील आपल्या पहिल्या सामन्यात 200 पार मजल मारली आहे. केकेआरने मुंबईसमोर 221 धावांचं आव्हान ठेवलं आहे. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 220 धावा केल्या. केकेआरसाठी कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी या दोघांनी सर्वाधिक आणि अर्धशतकी खेळी केली.
-
MI vs KKR IPL 2026 Live Score : रिंकू-अंगकृष जोडी जमली, केकेआर 200 पार
रिंकू सिंह आणि अंगकृष रघुंवंशी या जोडीने निर्णायक क्षणी चौथ्या विकेटसाठी महत्त्वाची भागीदारी करत केकेआरला 200 पार पोहचवलं आहे. केकेआरने 18.1 ओव्हरमध्ये 200 धावा पूर्ण केल्या.
-
MI vs KKR IPL 2026 Live Score : शार्दुलकडून रहाणेचा गेम, केकेआरला तिसरा झटका
शार्दुल ठाकुर याने केकेआरला तिसरा आणि सर्वात मोठा धक्का दिलाय. शार्दूलने केकेआरचा कॅप्टन अजिंक्य रहाणे याला आऊट केलं. शार्दुलने रहाणेला कॅप्टन हार्दिक पंड्या याच्या हाती कॅच आऊट केलं. अजिंक्यने 67 धावांची खेळी केली.
-
MI vs KKR IPL 2026 Live Score : कॅप्टन अजिंक्य रहाणे याचं अर्धशतक
कॅप्टन अजिंक्य रहाणे याने आयपीएल 2026 मधील केकेआरच्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. अजिंक्यने अवघ्या 27 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण करण्याची कामगिरी केली आहे.
-
MI vs KKR IPL 2026 Live Score : शार्दूलकडून सलग दुसरी शिकार, केकेआरला दुसरा झटका, कॅमरुन ग्रीन आऊट
शार्दुल ठाकुर याने केकेआरला सलग आणि एकूण दुसरा झटका दिला आहे. शार्दुलने फिन एलन याच्यानंतर कॅमरुन ग्रीन याला आऊट केलं आहे. ग्रीनने 18 धावांची खेळी केली. शार्दुूलने ग्रीनला शेरफेन रुदरफोर्ड याच्या हाती कॅच आऊट केलं.
-
MI vs KKR IPL 2026 Live Score : पॉवर प्लेच्या 6 षटकात केकेआरचा इम्पॅक्ट
पॉवर प्लेच्या 6 षटकात केकेआरचं वजन दिसून आलं. केकेआरने 1 गडी गमवून 78 धावा केल्या. अजिंक्य रहाणे आणि कॅमरून ग्रीन खेळत आहेत. त्यामुळे आक्रमक अंदाज पाहायला मिळणार यात काही शंका नाही. त्यानंतरच्या षटकात 16 धावा आल्या. त्यामुळे 7 षटकात 1 गडी गमवून 94 धावा झाल्यात.
-
MI vs KKR IPL 2026 Live Score : शार्दूलने केकेआरची सलामी जोडी फोडली, फिन एलन आऊट
शार्दुल ठाकुर याने केकेआरची सेट जोडी फोडली आहे. शार्दुलन फिन एलन याला तिलक वर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. फिनने 17 बॉलमध्ये 37 रन्सची खेळी करुन रहाणेसह 5.2 ओव्हरमध्ये 69 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली.
-
MI vs KKR IPL 2026 Live Score : केकेआरची संयमी सुरुवात, ओपनिंग जोडी सेट
कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्स विरुद्ध संयमी सुरुवात केली आहे. फिन एलन आणि अजिंक्य रहाणे या सलामी जोडीने 3 ओव्हरमध्ये नॉट आऊट 31 रन्स केल्या आहेत. फिन 20 आणि रहाणे 9 धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
MI vs KKR IPL 2026 Live Score : सामन्याला सुरुवात, केकेआरची बॅटिंग, रहाणे-एलन मैदानात
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबईने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. केकेआरकडून फिन एलन आणि कॅप्टन अजिंक्य रहाणे सलामी जोडी मैदानात आली आहे. तर मुंबईकडून ट्रेन्ट बोल्ट पहिली ओव्हर टाकत आहे.
-
MI vs KKR IPL 2026 Live Updates : केकेआर प्लेइंग ईलेव्हन
केकेआर प्लेइंग ईलेव्हन : फिन एलन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), कॅमेरुन ग्रीन, अंगकृष रघुवंशी (विकेटकीपर), रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा आणि ब्लेसिंग मुजराबानी
-
MI vs KKR IPL 2026 Live Updates : मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, नमन धीर, शार्दुल ठाकूर, मयंक मार्कंडे, एएम गझनफर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.
-
MI vs KKR IPL 2026 Live Updates : मुंबईने टॉस जिंकला, केकेआर विरुद्ध निर्णय काय?
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2026 स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध टॉस जिंकला आहे. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केकेआर पलटणसमोर किती धावा करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
MI vs KKR IPL 2026 Live Updates : थोड्याच वेळात टॉस, कोण जिंकणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. वानखेडे स्टेडियममध्ये सामना होत असल्याने मोठ्या प्रमाणात पलटणचे चाहते आले आहेत.
-
MI vs KKR IPL 2026 Live Updates : मुंबई इंडियन्स केकेआरवर वरचढ
आयपीएलच्या इतिहासात मुंबई केकेआरवर वरचढ राहिली आहे. उभयसंघात एकूण 35 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबईने त्यापैकी 24 सामने जिंकले आहेत. तर केकेआरने 11 सामन्यांत विजय मिळवला आहे.
-
MI vs KKR IPL 2026 Live Updates : मुंबई इंडियन्स टीम
रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, शार्दुल ठाकूर, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राज बावा, रॉबिन मिंझ, नमन धीर, रायन रिकेल्टन, एएम गझनफर, मयंक मार्कंडे, दानिश मलेवार, अश्वनी कुमार, मोहम्मद सलाहुद्दीन इझार, विल जॅक्स, मिचेल सँटनर, मयंक रावत, अथर्व अंकोलेकर आणि रघु शर्मा.
-
MI vs KKR IPL 2026 Live Updates : कोलकाता नाईट रायडर्स टीम
फिन ऍलन, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), कॅमेरुन ग्रीन, टीम साफर्ट (विकेटकीपर), रोवमन पॉवेल, आंगकृष्ण रघुवंशी, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, कार्तिक त्यागी, उमरान मलिक, राहुल त्रिपाठी, मनीष पांडे, वैभव अरोरा, रचिन रवींद्र, ब्लेसिंग मुजराबानी, नवदीप सैनी, प्रशांत सोलंकी, दक्ष कामरा, सार्थक रंजन, तेजस्वी दहिया आणि सौरभ दुबे.
-
MI vs KKR IPL 2026 Live Updates : मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआर आमनेसामने, कोण करणार विजयी सुरुवात?
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल 2026 मोसमातील आपला पहिला सामना एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे. हार्दिक पंड्या मुंबईचं तर अजिंक्य रहाणे केकेआरचं नेतृत्व करणार आहे.