MI vs RR : रोहितच्या नावावर शेवटच्या सामन्यात वानखेडेत नकोसा विक्रम, हिटमॅनसोबत काय झालं?

Most Ducks In IPL : राजस्थान रॉयल्सच्या जोफ्रा आर्चर याने रोहित शर्मा याला झिरोवर आऊट केलं. जोफ्राची रोहितला झिरोवर आऊट करण्याची आयपीएल स्पर्धेतील ही चौथी वेळ ठरली. रोहितच्या नावावर यासह नकोसा विक्रम झाला आहे. जाणून घ्या.

MI vs RR : रोहितच्या नावावर शेवटच्या सामन्यात वानखेडेत नकोसा विक्रम, हिटमॅनसोबत काय झालं?
Rohit Sharma MI IPL 2026
Image Credit source: PTI
| Updated on: May 24, 2026 | 11:24 PM

हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) प्लेऑफचं तिकीट मिळवण्यात अपयशी ठरली. इतकंच नाही तर मुंबईला या हंगामातील आपल्या मोहिमेचा शेवट विजयाने करता आला नाही. मुंबईला 24 मे रोजी घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये पाहुण्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध पराभूत व्हावं लागलं. मुंबईचा हा या हंगामातील राजस्थान रॉयल्स विरुद्धचा दुसरा पराभव ठरला. मुंबईला हा सामना जिंकून राजस्थानचा हिशोब करण्यासह मोहिमेचा शेवट विजयाने करण्याची संधी होती. मात्र पलटणला तसं करणं जमलं नाही. तसेच या सामन्यात मुंबईचा अनुभवी आणि प्रमुख फलंदाज रोहित शर्मा याच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे.

रोहित शर्मा झिरोवर आऊट, जोफा आर्चरकडून शिकार

राजस्थान रॉयल्सने मुंबईसमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईची या विजयी धावांचा पाठलाग करताना अतिशय निराशाजनक सुरुवात झाली. मुंबईने धावांचं खातं उघडण्याआधी विकेटं खातं उघडलं. जोफ्रा आर्चर याने रोहित शर्मा याला झिरोवर आऊट केलं. रोहितने यासह नको त्या विक्रमाची बरोबरी केली. रोहित आयपीएल स्पर्धेत संयुक्तरित्या सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणारा फलंदाज ठरला आहे. रोहितने यासह ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. रोहितची झिरोवर आऊट होण्याची ही 19 वी वेळ ठरली. रोहितप्रमाणे ग्लेन मॅक्सवेल हा देखील 19 वेळा झिरोवर मैदानाबाहेर गेला आहे.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक झिरोवर आऊट होणारे फलंदाज, पाहा यादी

ग्लेन मॅक्सवेल : 19

रोहित शर्मा : 19

दिनेश कार्तिक : 18

सुनील नारायण : 18

पीयूष चावला : 16

रोहितची आयपीएल 2026 स्पर्धेतील कामगिरी

रोहितला मुंबईसाठी दुखापतीमुळे 19 व्या मोसमातील संपूर्ण सामने खेळता आले नाहीत. रोहितने मुंबईचं या मोसमातील 9 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. रोहितने या दरम्यान 9 डावांत 35.27 च्या सरासरीने आणि 157.22 च्या स्ट्राईक रेटने एकूण 283 धावा केल्या. रोहितची या दरम्यान 84 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. तसेच रोहितने या हंगामात एकूण 2 अर्धशतकं लगावली.

हिटमॅन संयुक्तरित्या पहिल्या स्थानी

रोहितने दिनेश कार्तिकला पछाडलं

दरम्यान रोहितने केकेआर विरुद्ध झिरोवर आऊट होण्यासह दिनेश कार्तिक याला मागे टाकलं. माजी फलंदाज दिनेश कार्तिक आयपीएल स्पर्धेत एकूण 18 वेळा झिरोवर आऊट झाला होता.

Follow Us