AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘BCCI कडून परदेशी दौऱ्यावर गेल्यावर ‘तो’ रूममध्ये सेक्स वर्करला…’, टीम इंडियाच्या खेळाडूवर पत्नीचा गंभीर आरोप!

टीम इंडियामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनीही आपली छाप पाडली आहे. अशातच एका स्टार खेळाडूच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

'BCCI कडून परदेशी दौऱ्यावर गेल्यावर 'तो' रूममध्ये सेक्स वर्करला...', टीम इंडियाच्या खेळाडूवर पत्नीचा गंभीर आरोप!
| Updated on: May 03, 2023 | 8:04 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 सुरू होत असून अटीतटीचे आणि रोमहर्षक सामने पाहायला मिळत आहेत. युवा खेळाडू आपली छाप उमटवत आहेत. टीम इंडियामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनीही आपली छाप पाडली आहे. अशातच एका स्टार खेळाडूच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. संबंधित खेळाडूच्या पत्नीने कोर्टाची पायरी चढली असून त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

कोणत्या खेळाडूवर आरोप झालेत?

मुळचा उत्तर प्रदेशचा असलेला हा टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मोहम्मद शमी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेला आव्हान देत हसीन जहाँने कोलकाता उच्च न्यायालयाच्या त्या आदेशाला विरोध केला आहे. यामध्ये सत्र न्यायालयाने शमीविरुद्ध जारी केलेल्या अटक वॉरंटला स्थगिती दिली होती. त्याने सहभाग नाकारला असून हुंडा मागणी आणि विवाहबाह्य संबंधांचे आरोपही केले आहेत.

2018 मध्ये हसीन जहाँने मोहम्मद शमीवर घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगसह अनेक गंभीर आरोप केले होते. यानंतर दोघेही वेगळे राहू लागले आणि कोर्टात केस सुरू झाली. मोहम्मद शमीने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणी 2018 साली कोलकाता पोलिसांनी शमीचीही चौकशी केली होती. अलीपूर कोर्टानेही या क्रिकेटपटूविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. मात्र, नंतर वॉरंटला स्थगिती देण्यात आली.

सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेत हसीन जहाँने याचिकेमध्ये, शमी सतत सेक्स वर्करसोबत बेकायदेशीर विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवत होता. क्रिकेट सामन्यांसाठी परदेशी दौऱ्याला गे्ल्यावर बीसीसीआयने दिलेल्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये त्याचं हे सुरू असतं आणि अजूनही हे चालू असल्याचं म्हटलं आहे.

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचं 2014 मध्ये लग्न झालं होतं. लग्नाच्या काही वर्षानंतर हसीना जहाँने शमीवर अनेक आरोप करायला सुरुवात केली. शमीने हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि इतर महिलांसोबत संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.