मुंबईच्या मुलांची कमाल, Ranji Trophy मध्ये महारेकॉर्ड, 725 धावांनी मिळवला विजय

| Updated on: Jun 09, 2022 | 2:28 PM

रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबईने उत्तराखंडला (Mumbai vs Uttarakhand) हरवून इतिहास रचला आहे. मुंबईने उत्तराखंडवर 725 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

मुंबईच्या मुलांची कमाल, Ranji Trophy मध्ये महारेकॉर्ड, 725 धावांनी मिळवला विजय
Mumbai Record win over uttarakhand
Image Credit source: BCCI
Follow us on

मुंबई: रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबईने उत्तराखंडला (Mumbai vs Uttarakhand) हरवून इतिहास रचला आहे. मुंबईने उत्तराखंडवर 725 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय (Record win of Mumbai) आहे. मुंबईने उत्तराखंडला विजयासाठी 795 धावांचं टार्गेट दिलं होतं. या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्याडावात उत्तराखंडची टीम अवघ्या 69 रन्समध्ये ऑलआऊट झाली. रणजी ट्रॉफीच नाही, फर्स्ट क्लास क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी 1929-30 साली न्यू साउथ वेल्सने क्वीन्सलँडला 625 धावांनी हरवलं होतं. आता 93 वर्षानंतर मुंबईने एक नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केला.

मुंबईचा संघ रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये

मुंबईच्या टीमने क्वार्टरफायनलमध्ये उत्तराखंडवर एकतर्फी विजय मिळवला. पहिल्या डावात मुंबईने 8 विकेट गमावून 647 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सुवेद पारकरने डेब्यु मॅचमध्येच 252 धावा फटकावल्या. सर्फराज खानने 153 धावा केल्या. अरमान जाफरने 60 आणि शम्स मुलानी 59 धावांची इनिंग खेळला. उत्तराखंडचा पहिला डाव 114 धावात आटोपला. कमल सिंहच्या 40 धावांशिवाय दुसरा कुठलाही खेळाडू खेळपट्टीवर टिकू शकला नाही. कॅप्टन जय बिस्ता तर पहिल्या चेंडूवर आऊट झाला. दुसऱ्या डावात कॅप्टन पृथ्वी शॉ ने 72 आणि यशस्वी जैस्वाल 103 धावांची शतकी खेळी खेळला. विकेटकीपर आदित्य तरेने 57 धावा केल्या. दुसरा डाव मुंबईने 261 धावांवर घोषित केला. त्यानंतर 795 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तराखंडचा डाव 69 धावात आटोपला.

पृथ्वी शॉ च्या कॅप्टनशिपचा जलवा

पृथ्वी शॉ च्या नेतृत्वाखाली नेहमीच संघाला मोठा विजय मिळाला आहे. 2018 मध्ये पृथ्वीच्या नेतृत्वाखालीच भारताने अंडर-19 चा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर मागच्यावर्षी त्याच्याच नेतृत्वाखाली मुंबईने विजय हजारे ट्रॉफी जिंकली होती. पृथ्वी शॉ च्या नेतृत्वाखाली मुंबईने फर्स्ट क्लासच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. मुंबईचा संघ रणजी ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे.