
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 57 व्या सामन्यात सनरायजर्स हैदरबादने लखनऊ सुपर जायंट्सवर 10 विकेट्सने विजय मिळवत कॅप्टन पॅट कमिन्स याला बर्थडे गिफ्ट दिलं. लखनऊ सुपर जायंट्सने हैदराबादला विजयासाठी 166 धावांचं आव्हान दिलं होतं. हैदराबादच्या सलामी जोडीने हे आव्हान 10 ओव्हरच्या आतच पूर्ण केलं. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी लखनऊच्या गोलंदाजांवर तुटून पडली. हेडने 89 आणि शर्माने नाबाद 75 धावा केल्या. हैदराबादने या विजयासह प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. तसेच पराभवानंतरही लखनऊचं आव्हान कायम शाबूत आहे. तर हैदराबादच्या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या 17 व्या मोसमातून बाजार उठला आहे. मुंबईचं आव्हान संपुष्टात आलं आहे. लखनऊने हा सामना जिंकला असता, तर मुंबईच्या आशा कायम राहिल्या असत्या.
कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 16-16 पॉइंट्स आहेत. तर हैदराबादचे या विजयानंतर 14 पॉइंट्स झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिट्ल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या तिन्ही संघांकडे 12-12 पॉइंट्स आहेत. तर मुंबईचे 12 सामन्यानंतर 8 पॉइंट्स आहेत. त्यामुळे मुंबईने उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरी 12 पॉइंट्स होतील. तर लखनऊ आणि दिल्लीचे सामने बाकी आहेत. त्यामुळे लखनऊ आणि दिल्लीपैकी एका संघाचे 14 पॉइंट्स होतील. त्यामुळे मुंबईचं आव्हान संपुष्टात आलंय.
सनरायजर्स हैदराबादने विजयासाठी मिळालेलं 166 धावांचं आव्हान हे 62 बॉल राखून पूर्ण केलं. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच 150 पेक्षा अधिक धावांचं आव्हान हे 10 ओव्हरमध्ये पूर्ण झाल्या. याआधी दिल्लीने 2022 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध 116 धावांचं आव्हान हे 11.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं होतं. तसेच डेक्कन चार्जर्सने 2008 साली मुंबई विरुद्ध 12 ओव्हरमध्ये 155 धावा पूर्ण केल्या होत्या.
पलटणचं पॅकअप
With SRH’s win against LSG, Mumbai Indians are officially out of the tournament. Hardik Pandya as captain suffers first-ever group stage exit.
Hardik as IPL Captain:
2022 – Champions
2023 – Runners up
2024 – Eliminated#IPL2024 pic.twitter.com/Lw6D0EsHyk— CricTracker (@Cricketracker) May 8, 2024
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, दीपक हुडा, कृणाल पंड्या, कृष्णप्पा गौथम, यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि नवीन-उल-हक.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, विजयकांत व्यासकांत आणि टी नटराजन.