रोहित शर्माच्या पोस्टवर Mumbai Indians ची उपहासात्मक कमेंट, सर्व ठीक आहे ना?

| Updated on: Jun 02, 2022 | 12:01 PM

या फोटोला 'बॅक टू स्कूल' असं कॅप्शन दिलय. रोहितने शेअर केलेल्या या फोटोला काही कमेंटस आणि लाईक्सही मिळाल्या.

रोहित शर्माच्या पोस्टवर Mumbai Indians ची  उपहासात्मक कमेंट, सर्व ठीक आहे ना?
Rohit sharma
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 15 वा हंगाम संपल्यानंतर भारतीय संघातील काही सीनियर खेळाडूंना विश्रांतीसाठी थोडा अवधी मिळाला आहे. कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) अशा ब्रेकचीच गरज होती. कारण यंदाच्या सीजनमध्ये त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. एकही अर्धशतक त्याच्या बॅटमधून निघालं नाही. संघाची (Mumbai Indians) खराब कामगिरी आणि कॅप्टनशिपचा दबाव यामुळे रोहितला अशा ब्रेकची गरज होती. जेणेकरुन मानसिक थकवा दूर होईल. आयपीएलचा सीजन संपत असताना, रोहित पत्नी आणि मुलीसोबत मालदीवला गेला होता. आता तो मुंबईत परतला असून मोकळ्या वेळेत त्याने आपल्या शाळेला भेट दिली. रोहितने शाळेला भेट दिली, तेव्हा त्याने तिथला एक फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

मुंबई इंडियन्सने एक कमेंट केलीय

या फोटोला ‘बॅक टू स्कूल’ असं कॅप्शन दिलय. रोहितने शेअर केलेल्या या फोटोला काही कमेंटस आणि लाईक्सही मिळाल्या. या फोटोमध्ये रोहित रिलॅक्स मूडमध्ये दिसतोय. रोहितच्या या फोटोवर त्याची फ्रेंचायची मुंबई इंडियन्सने एक कमेंट केलीय. या कमेंटने लक्ष वेधून घेतलय. कारण ही कमेंट मजेशीर वाटत असली, तरी ती उपहासात्मक सुद्धा आहे. ‘शिक्षक म्हणून गेलायस की, विद्यार्थी म्हणून’ असं मुंबई इंडियन्सने आपल्या कमेंटमध्ये म्हटलं आहे.

रोहित आणि मुंबई इंडियन्सलाही ते लक्षात ठेवयाचं नसेल

यंदाच्या सीजनबद्दल बोलायच झाल्यास मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा दोघांनाही हा सीजन लक्षात ठेवण्याची इच्छा नसेल. कारण पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ तळाला होता. त्यांनी सलग आठ सामने गमावले. कॅप्टन म्हणून रोहित शर्मालाही प्रभावी कामगिरी करता आली नाही. 14 सामन्यात रोहितने 268 धावा केल्या. IPL 2022 मधला रोहितची सर्वोच्च धावसंख्या आहे 48.

चुकांवर विचार करण्यासाठी वेळ

रोहितकडे आता मोकळ्या वेळेत झालेल्या चुकांवर विचार करुन सुधारणा करण्यासाठी वेळ आहे. पुढच्या आठवड्यापासून भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी 20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. पण त्यात रोहित शर्मा नाहीय. रोहितला विश्रांती देण्यात आलीय.