Mumbai Indians IPL 2022: Rohit sharma मालदीवमध्ये, शेअर केला बायकोसोबत रोमँटिक फोटो

Mumbai Indians IPL 2022: Rohit sharma मालदीवमध्ये, शेअर केला बायकोसोबत रोमँटिक फोटो
ritika-rohit
Image Credit source: instagram

Mumbai Indians IPL 2022: आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात इतकी खराब कामगिरी कधी मुंबई इंडियन्सने केली नव्हती. सुरुवातीचे सलग आठ सामने त्यांनी गमावले.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 24, 2022 | 8:44 PM

मुंबई: सलग दोन महिने सुरु असलेल्या इंडियन प्रिमीयर लीगच्या (IPL) सीजनमुळे भारताच्या काही सिनियर खेळाडूंना सक्तीच्या विश्रांतीची गरज होती. शारीरिक थकव्याबरोबरच या सिनियर खेळाडूंना मानसिक विश्रांतीचीही गरज होती. कारण ते फॉर्मसाठी चाचपडत होते. त्यांना लौकीकाला साजेशी कामगिरी करता येत नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर सतत ताण येत होता. भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit sharma) आणि विराट कोहली (Virat kohli) हे ते दोन खेळाडू आहे. ज्यांच्यावर यंदाच्या सीजनमध्ये भरपूर टीका झाली. कारण त्यांना अपेक्षेनुसार कामगिरीच करता येत नव्हती. सीजन संपत असताना, विराटला आता कुठे सूर गवसतोय, असं दिसतय. निदान त्याला दोन अर्धशतक तरी झळकवता आली. पण रोहितची अवस्था त्यापेक्षाही वाईट होती. अर्धशतक झळकावण सोडा पण त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने खूपच सुमार कामगिरी केली.

मानसिक दबाव येण स्वाभाविक

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात इतकी खराब कामगिरी कधी मुंबई इंडियन्सने केली नव्हती. सुरुवातीचे सलग आठ सामने त्यांनी गमावले. एकतर रोहितच्या स्वत:च्या कामगिरीत सातत्य नव्हतं, त्यावेळी टीमचा परफॉर्मन्सही खराब होता. त्यामुळे त्याच्यावर मानसिक दबाव येण स्वाभाविक आहे. त्यामुळे रोहित शर्माला एक ब्रेकची नितांत गरज होती. आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

रोहितने शेअर केला रोमँटिक फोटो

या सीरीजसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने रोहित शर्मा, विराट कोहली यांना विश्रांती दिली आहे. रोहित या ब्रेकच्या काळात रिफ्रेश होण्यासाठी कुटुंबासोबत मालदीवला गेला आहे. त्याने पत्नी रितिका सजदेहसोबतचा एक रोमँटिक फोटोही इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

फॉर्म परत मिळवण्यासाठी रोहित काय करणार ते वाचा

“मी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. पण मनासारखं घडलं नाही. हे माझ्या बरोबर पहिल्यांदा झालेलं नाही. हे या आधी सुद्धा घडलय. क्रिकेट इथेच संपत नाही. अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे. मला मानसिक दृष्ट्या मजबूत राहून, पुन्हा फॉर्म परत कसा मिळवता येईल, ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मला जो काही वेळ मिळालाय, मी त्यावरच मेहनत घेणार आहे. मला माझ्या फलंदाजीतील काही त्रुटींवर काम करायचं आहे” असं रोहितने उत्तर दिलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें