AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही अश्लील मेसेज पाठवलेत, आता तुम्हाला…; घाबरलेल्या आजोबांसोबत नेमकं काय घडलं?

ठाण्यात एका ६४ वर्षीय वृद्धाला 'डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात ओढून १ कोटी ५६ लाखांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायबर चोरट्यांनी पोलीस अधिकारी असल्याचे भासवून महिनाभर मानसिक दबावाखाली ठेवत ही फसवणूक केली.

तुम्ही अश्लील मेसेज पाठवलेत, आता तुम्हाला...; घाबरलेल्या आजोबांसोबत नेमकं काय घडलं?
thane (फोटो प्रातनिधिक)
| Updated on: Mar 11, 2026 | 1:33 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्ह्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. यावेळी सायबर गुन्हेगार वृद्धांना टार्गेट करुन त्यांची लूट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता नुकतंच मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाण्यात एका ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी फसवल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. यावेळी सायबर चोरट्यांनी डिजिटल अरेस्ट (Digital Arrest) च्या जाळ्यात ओढून तब्बल १ कोटी ५६ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी आरोपींनी पोलीस अधिकारी असल्याचे भासवून पीडित व्यक्तीला महिनाभर मानसिक दबावाखाली ठेवले आणि त्यांच्या आयुष्यभराची सर्व पुंजी लुटली.

बनावट कागदपत्रांचा आधार आणि भीतीचे वातावरण

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील एका ६४ वर्षीय व्यक्तीशी सायबर चोरट्यांनी विविध मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधला. यावेळी त्यांनी स्वतःची ओळख मुंबई पोलीस अधिकारी म्हणून करून दिली. या फोनद्वारे त्यांनी पीडित वृद्ध व्यक्तीवर अत्यंत गंभीर आरोप केले. तुम्ही ४० महिलांना अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवले आहात. तुमचे आधार कार्ड आणि बँक तपशील एका हाय-प्रोफाईल मनी लाँड्रिंग प्रकरणाशी जोडले गेले आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरच तुम्हाला अटक करण्यात येईल, असा दावा सायबर चोरट्यांनी फोन द्वारे केला.

यानंतर या वृद्ध व्यक्तीची खात्री पटावी, म्हणून गुन्हेगारांनी मुंबई पोलिसांचा बनावट एफआयआर (FIR), बनावट बँक पत्रे आणि चक्क इंटरपोलची (Interpol) बनावट रेड कॉर्नर नोटीस व्हॉट्सअॅपवर पाठवली. यामुळे त्या वृद्ध व्यक्तीला विश्वास बसला आणि तो प्रचंड घाबरला. यानंतर १२ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२६ या काळात त्याला डिजिटल अरेस्ट करण्यात आले.

अन्यथा तुम्हाला तुरुंगात जावे लागेल

यावेळी आरोपींनी त्यांना ‘सिग्नल’ (Signal) मेसेजिंग अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. या अॅपद्वारे त्यांच्यावर २४ तास ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलद्वारे पाळत ठेवली जात होती. पीडितेच्या पत्नीवरही नजर ठेवली जात असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. यामुळे त्यांना कोणाकडेही मदत मागता आली नाही. यानंतर आरोपींनी तुमची बँक खाती आणि बचतीची रक्कम पडताळणीसाठी आरबीआयकडे (RBI) जमा करावी लागेल, अन्यथा तुम्हाला तुरुंगात जावे लागेल,” असे त्या वृद्ध व्यक्तीला सांगितले. आधी या प्रकरणामुळे घाबरलेला तो आणखी घाबरला.

या दबावाखाली येऊन त्या वृद्ध पीडिताने आरटीजीएस (RTGS) द्वारे एकूण १,५६,४५,००० रुपये आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये वर्ग केले. मात्र यानंतर त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने अखेर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेतली. बदलापूर पोलिसांनी याप्रकरणी खंडणी (कलम ३०८-२), फसवणूक (कलम ३१८) आणि गुन्हेगारी कट (कलम ६१-२) यांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नसली तरी आरोपींचा बँक खात्यांचा तपास सुरु आहे.

दरम्यान डिजिटल अरेस्ट ही पूर्णपणे बेकायदेशीर प्रक्रिया आहे. कोणतीही पोलीस यंत्रणा अशा प्रकारे व्हिडिओ कॉलवर अटक करत नाही. अशा घटना घडल्यास त्वरित १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच