मुंबईच्या खेळाडूची कमाल, तब्बल 4,325 मिनिटं केली बॅटिंग, गिनीजमध्ये नोंद होणार?

| Updated on: Mar 01, 2022 | 10:13 PM

मुंबईतील सिद्धार्थ मोहिते (Siddharth Mohite) या किशोरवयीन मुलाने नेट सेशनमध्ये तब्बल 72 तास पाच मिनिटे (4325 Min) क्रीजवर राहून सर्वाधिक वेळ फलंदाजी (72 Hours Batting) करण्याचा विक्रम केला आहे. तो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (Guinness World Records) आपल्या कामगिरीची नोंद होण्याची वाट पाहत आहे.

मुंबईच्या खेळाडूची कमाल, तब्बल 4,325 मिनिटं केली बॅटिंग, गिनीजमध्ये नोंद होणार?
Siddharth Mohite
Image Credit source: Indian Express
Follow us on

मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिम येथील सिद्धार्थ मोहिते (Siddharth Mohite) या किशोरवयीन मुलाने नेट सेशनमध्ये तब्बल 72 तास पाच मिनिटे (4325 Min) क्रीजवर राहून सर्वाधिक वेळ फलंदाजी (72 Hours Batting) करण्याचा विक्रम केला आहे. तो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (Guinness World Records) आपल्या कामगिरीची नोंद होण्याची वाट पाहत आहे. 19 वर्षीय सिद्धार्थने गेल्या आठवड्याच्या शेवटी 72 तास आणि पाच मिनिटे फलंदाजी करून भारतीय क्रिकेटपटू विराग मानेचा 2015 मधील 50 तास फलंदाजी करण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. मोहितेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे. मी वेगळा आहे हे लोकांना दाखवण्याचा हा एक मार्ग होता.” मोहितेला त्याच्या प्रयत्नात त्याच्या प्रशिक्षक ज्वाला सिंह यांनीही मदत केली.

इंडिन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार सिद्धार्थ या रेकॉर्डनंतर म्हणाला, ‘सगळे मला नकार देत होते. त्यानंतर मी ज्वाला सरांशी संपर्क साधला आणि ते माझ्यासोबत उभे राहिले. त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला आणि मला जे आवश्यक आहे त्यात मदत केली. नियमानुसार फलंदाजाला तासाभरात पाच मिनिटांची विश्रांती घेता येते. मोहिते याचे रेकॉर्डिंग आणि संबंधित कागदपत्रे आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे पाठवण्यात आली आहेत. दरम्यान, गोलंदाजांचा एक गट मोहितेच्या पाठिशी पूर्ण सत्र उभा राहिला.

सिद्धार्थ मागील साधारण 8 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सिद्धार्थ पूर्वतयारीनिशी मैदानात उतरला होता. मागील साधारण दीड वर्षापासून तो हा रेकॉर्ड करण्यासाठी शारीरिक तसेच मानसिक तयारी करत असल्याची माहिती त्याने दिली.

भाऊ आणि मित्रांनी मदत केली

सिद्धार्थ त्याच्या चुलत भाऊ आणि मित्रांशी बोलला, ज्यांनी गोष्टी सेट करण्यास मदत केली. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद पाठवण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. सिद्धार्थचा चुलत भाऊ वैभव याने त्याच्या फलंदाजीवर 3 दिवस लक्ष ठेवण्यासाठी साक्षीदारांची व्यवस्था केली. फलंदाजीचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचे काम एका व्यक्तीला देण्यात आले होते.

इतर बातम्या

Rohit Sharma: ‘रोहित शर्मा आज संघात आहे कारण…’ एका मोठ्या क्रिकेटपटूने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

Salil Ankola: 28 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती, मग बॉलिवूड गाजवलं, आता मुंबई क्रिकेटमध्ये मोठी जबाबदारी

Russia Ukraine War: रशियन फौजांच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावलं केविन पीटरसनचं कुटुंब