AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Trophy: मुंबईसह युपी, उत्तराखंडने रणजी स्पर्धेत मिळवला एका डावाने विजय, जाणून घ्या

रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरु असून वेळापत्रकानुसार सामने पार पडत आहे. रणजी स्पर्धेतील चौथ्या टप्प्याचे सामने सुरु आहेत. या टप्प्यात तिसऱ्या दिवशी मुंबई, युपी आणि उत्तराखंडने विजय मिळवला आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर

Ranji Trophy: मुंबईसह युपी, उत्तराखंडने रणजी स्पर्धेत मिळवला एका डावाने विजय, जाणून घ्या
Ranji Trophy: मुंबईसह युपी, उत्तराखंडने रणजी स्पर्धेत मिळवला एका डावाने विजय, जाणून घ्याImage Credit source: BCCI Domestic
| Updated on: Nov 10, 2025 | 9:14 PM
Share

रणजी ट्रॉफी स्पर्धा ही देशातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. 2025-2026 या वर्षासाठी पर्व सुरु झालं असून चौथ्या टप्प्याचे सामने सुरु आहेत. 8 नोव्हेंबरपासून प्रत्येक संघ चौथा सामना खेळत असून सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी काही सामन्यांचा निकाल लागला आहे. तिसऱ्या दिवशी मुंबई, यपी आणि उत्तराखंडने एका डावाने विजय मिळवला आहे. तर आंध्र प्रदेशने तामिळनाडूला 4 विकेट राखून पराभूत केलं. मुंबईचा सामना हिमाचलशी, युपीचा सामना सामना नागालँडशी, तर उत्तराखंडचा सामना हरयाणाशी झाला. तामिळनाडूने पहिल्या डावात 182 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना आंध्र प्रदेशचा संघ 177 धावांवर बाद झाला. तामिळनाडूने दुसऱ्या डावात 195 धावा केल्या. आंध्र प्रदेशने 6 गडी गमवून दिलेलं आव्हान पूर्ण केलं. दुसरीकडे, महाराष्ट्र-कर्नाटक सामना ड्रॉ होण्याची शक्यता आहे. विदर्भ ओडिशाविरुद्धचा सामना जिंकू शकते. ओडिशाला अजून्ही 301 धावांची गरज असून विदर्भला शेवटच्या दिवशी 10 विकेट्स घ्यावा लागतील.

मुंबई विरुद्ध हिमाचल प्रदेश

मुंबईने हिमाचल प्रदेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना मुशीर खानच्या 112 आणि सिदेश लाडच्या 127 धावांच्या जोरावर 446 धावा केल्या. हिमाचल प्रदेशचा पहिला डाव 187 धावांवर आटोपला आणि मुंबईला 259 धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. हिमाचल प्रदेश दुसऱ्या डावात 139 धावा करू शकले. हा सामना मुंबईने एक डाव आणि 120 धावांनी जिंकला. मुंबईचा संघ ग्रुप डी मध्ये 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.

उत्तर प्रदेश विरुद्ध नागालँड

उत्तर प्रदेशने नागालँडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 535 धावा केल्या आणि डाव घोषित केला. या धावांचा पाठलाग करताना नागालँडचा पहिला डाव 117 धावांवर आटोपला. तर दुसऱ्या डावात नागालँडचा संघ 153 धावा करू शकला. उत्तर प्रदेशने हा सामना एक डाव आणि 265 धावांनी सामना जिंकला. उत्तर प्रदेशचा संघ 13 गुणांसह ग्रुप ए मध्ये चौथ्या स्थानावर आहे.

उत्तराखंड विरुद्ध हरयाणा

उत्तराखंडने हरियाणाविरुद्ध एक डाव आणि 28 धावांनी विजय मिळवला. उत्तराखंडने पहिल्या डावात 288 धावा केल्या. पण या धावा हरयाणाला दोन्ही डावात करता आल्या नाहीत. पहिल्या डावात 122 आणि दुसऱ्या डावात 148 धावा केल्या.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...