मुंबई क्रिकेट असोसिएशन
मुंबई क्रिकेट असोसिएशनची स्थापना 1930 मध्ये करण्यात आली आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अधिकार क्षेत्र आहे. डॉ. एच डी कांगा हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पहिले अध्यक्ष होते. शरद पवार, आशिष शेलार, दिवंगत मनोहर जोशी, दिवंगत विलासराव देशमुख या राजकीय नेत्यांनी एमसीएचं अध्यक्षपद भूषवलं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची निवड झाली आहे. असोसिएशनचे कामकाज एका सर्वोच्च परिषदेद्वारे चालवले जाते ज्याची निवड दर तीन वर्षांनी 350 सदस्यीय क्लब असलेल्या जनरल बॉडीद्वारे केली जाते. असोसिएशनमध्ये कोणतेही वैयक्तिक सदस्य नसतात. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिपत्याखाली असलेल्या मुंबई संघाने 41 वेळा रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
MCA : जितेंद्र आव्हाड यांची एमसीएच्या उपाध्यपदी निवड, नवीन शेट्टी यांचा धुव्वा
Mca Vice President Election Result 2025 : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एमसीएच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. जितेंद्र आव्हाड यांची एमसीएच्या उपाध्यपदी निवड करण्यात आली आहे.
- sanjay patil
- Updated on: Nov 12, 2025
- 10:36 pm
Ranji Trophy: मुंबईसह युपी, उत्तराखंडने रणजी स्पर्धेत मिळवला एका डावाने विजय, जाणून घ्या
रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरु असून वेळापत्रकानुसार सामने पार पडत आहे. रणजी स्पर्धेतील चौथ्या टप्प्याचे सामने सुरु आहेत. या टप्प्यात तिसऱ्या दिवशी मुंबई, युपी आणि उत्तराखंडने विजय मिळवला आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 10, 2025
- 9:14 pm
MCA Election 2025 : एमसीएच्या अध्यक्षपदी पुन्हा अजिंक्य नाईक, अशा घडल्या घडामोडी
मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिग्गज उतरल्याने घडामोडींना वेग आला आहे. असं असताना अर्ज मागे घेण्यासाठी काही तास शिल्लक असताना प्रसाद लाड यांनी माघार घेतली आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 10, 2025
- 5:38 pm