AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SMAT 2025 MUM vs HYD : हैदराबादने मुंबईचा 9 गडी राखून केला पराभव, सुपर लीग फेरीत अशी उलथापालथ

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सुपर लीग स्पर्धेत मुंबई आणि हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात मुंबईचा दारूण पराभव झाला. त्यामुळे आता अंतिम फेरीत खेळण्याचं स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. कसं काय ते समजून घ्या.

SMAT 2025 MUM vs HYD : हैदराबादने मुंबईचा 9 गडी राखून केला पराभव, सुपर लीग फेरीत अशी उलथापालथ
हैदराबादने मुंबईचा 9 गडी राखून केला पराभव, सुपर लीग फेरीत अशी उलथापालथImage Credit source: video grab/Twitter
| Updated on: Dec 12, 2025 | 9:33 PM
Share

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील सुपर लीग स्पर्धेत मुंबई आणि हैदराबाद हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात हैदराबादने मुंबईला 9 गडी राखून पराभूत केलं. तसेच गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. तर मुंबईचं पुढे गणित बिघडलं आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा हैदराबादच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईचा डावाची सुरूवात आणि शेवटही काही खास झाला नाही. मुंबईने 18.5 षटकात सर्व गडी गमवून 131 धावा केल्या आणि विजयासाठी 132 धावा दिल्या. मुंबईकडून यशस्वी जयस्वालने 29 , हार्दिक तामोरेने 29 आणि सुर्यांग शेडगेने 28 धावा केल्या. तर साईराज पाटील याने नाबाद 12 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकलं नाही. अजिंक्य रहाणे 9, सरफराज खान 5, अंगकृष रघुवंशी 4, अंकोलेकर 3, शार्दुल ठाकुर 0, तनुष कोटियन 2 आणि तुषार देशपांडने 1 धाव केली.

सय्यद मुश्ताक अली 2025 स्पर्धेत हैदराबादकडून मोहम्मद सिराजने सर्वोत्तम स्पेल टाकला त्याने 3.5 षचटकात 17 धावा देत 3 गडी बाद केले. तर चामा मिलिंदने 2, तनय त्यागराजनने 2, नितीन यादवने 1, मोहम्मद अहमदने 1 विकेट घेतली. विजयी धावांचा पाठलाग करताना हैदराबादकडून अमन राव आणि तन्मय अग्रवाल यांनी आक्रमक खेळी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली. तन्मय अग्रवाल 40 चेंडूत 75 धावा करून बाद झाला. तर अमन रावने 29 चेंडूत नाबद 52 धावा केल्या. तर प्रग्नय रेड्डी नाबाद 1 धावेवर राहिला.

गुणतालिकेत अशी उलथापालथ

या विजयासह हैदराबादचा संघ 4 गुण आणि +4.605 नेर रनरेटसह अव्वल स्थानी आहे. तर हरियाणाचा संघ 4 गुण आणि +1.543 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान आणि मुंबईने पहिला सामना सामना गमवल्याने खात्यात काहीच नाही. पण मुंबईचा नेट रनरेट हा -4.605 त्यामुळे या गटात अव्वल स्थानी राहणं कठीण आहे. आता उर्वरित दोन्ही सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. इतकंच काय तर हैदराबादने दोन्ही सामने किंवा एक सामना मोठ्या फरकाने गमवणं गरजेचं आहे. पण हे गणित कठी दिसत असून अंतिम फेरीत पोहचणं कठीण आहे. या गटातील टॉपला असलेला संघ 18 डिसेंबर रोजी पुण्यातील एमसीए स्टेडियमवर जेतेपदासाठी खेळेल.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.