रणवीर सिंह मोठ्या अडचणीत, ते प्रकरण भोवलं, थेट FIR दाखल, कारवाई होणार?
बॉलिवुडमधील स्टार अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या धुरंधर चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याने या चित्रपटात केलेल्या कामाचे सगळीकडे कौतुक होते आहे. विशेष म्हणजे धुरंधर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमागिरी केली आहे.

Ranveer Singh FIR : बॉलिवुडमधील स्टार अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या धुरंधर चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याने या चित्रपटात केलेल्या कामाचे सगळीकडे कौतुक होते आहे. विशेष म्हणजे धुरंधर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमागिरी केली आहे. एकीकडे या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. परंतु आता रणवीर सिंह मात्र चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरोधात बंगळुरूमध्ये थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा त्याच्यावर आरोप असून त्याच्याविरोधात थेच एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
कातारा चित्रपटाची उडवली होती खिल्ली
काही दिवसांपूर्वी गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅनशल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये (IFFI) रणवीर सिंह यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्याने या कार्यक्रमात 28 नोव्हेंबर 2025 रोजी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात कांतारा चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते ऋषभ शेट्टी हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या मंचावर जाऊन रणवीर सिंह याने कांतारा चॅप्टर-1 या चित्रपटावर भाष्य केले होते. त्याने या चित्रपटाचा आधार घेत विनोद करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु या विनोदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे त्याच्यावर सडकून टीका चालू झाली. त्याने देवाची नक्कल केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर रणवीर सिंह चांगलाच वादात सापडला.
रणवीस सिंह याच्यावर कोणते आरोप आहेत?
बंगळुरूच्या ACJM कोर्टात रणवीर सिंहविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. रणवीर सिंहच्या विनोदामुळे भाविकांच्या भावना दुखवाल्या आहेत. अॅड. प्रशांत मेथल यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर बंगळुरू पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यात आला. बीएनएसच्या 196, 302 आणि 299 कलमाअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे आता पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, रणवीर सिंह आता या तक्रारीवर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे धुरंधर चित्रपटामुळे सध्या त्याच्याकडे चित्रपटांचा ओघ वाढला आहे. भविष्यात तो आणखी मोठ्या चित्रपटांत झळकणार आहे.
