AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav : कॅप्टन बदलला, सूर्यकुमार आऊट, भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान टीम जाहीर, कुणाला संधी?

Vijay Hazare Trophy 2025-26 : मुंबई क्रिकेट बोडाने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्य पूर्व फेरीतील सामन्यासाठी 16 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. या संघातून शिवम दुबे-सूर्यकुमार यादव यांना मुक्त करण्यात आलं आहे

Suryakumar Yadav : कॅप्टन बदलला, सूर्यकुमार आऊट, भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान टीम जाहीर, कुणाला संधी?
Suryakumar Yadav Team IndiaImage Credit source: @surya_14kumar X Account
| Updated on: Jan 11, 2026 | 9:03 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना सुरु असताना निवड समितीने महत्त्वाच्या स्पर्धेतील बाद फेरीसाठी रविवारी 11 जानेवारीला टीम जाहीर केली आहे. निवड समितीने पुन्हा एकदा कर्णधार बदलला आहे. तसेच काही कॅप्ड खेळाडूंना संघातून मुक्त केलं आहे. निवड समितीकडून संघात कुणाला संधी देण्यात आलीय? तसेच कर्णधार कुणाला करण्यात आलंय? हे सविस्तर जाणून घेऊयात.

मुंबई टीम जाहीर

एमसीए निवड समितीने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 2025-2026 या मोसमातील उपांत्य पूर्व फेरीतील सामन्यासाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. मुंबई या सामन्यात प्रमुख खेळाडूंशिवाय खेळणार आहे. एमसीएने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

सिद्धेश लाड कर्णधार

रोहित शर्मा याचा खास सहकारी मित्र आणि सिद्धेश लाड याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शार्दूल ठाकुर याला झालेल्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र श्रेयस न्यूझीलंड विरुद्ध खेळत असल्याने त्याला संघातून मुक्त करण्यात आलंय. अशात आता सिद्धेश लाड याला कर्णधार करण्यात आलं आहे.

श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे शार्दूल ठाकुर याने साखळी फेरीत मुंबईचं नेतृत्व केलं. मात्र शार्दूलला मुंबईच्या साखळी फेरीतील शेवटच्या 2 सामन्यांआधी दुखापत झाली. त्यामुळे दुखापतीनंतर संघात परतलेल्या श्रेयस अय्यर याने साखळी फेरीतील शेवटच्या 2 सामन्यात मुंबईचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर श्रेयसला न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेसाठी मुक्त करण्यात आलं. त्यामुळे आता सिद्धेश लाड याला मोठी जबाबदारी मिळाली आहे. तर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या दोघांनाही रिलीज करण्यात आलंय.

मुंबईची साखळी फेरीतील कामगिरी

मुंबईने साखळी फेरीत चमकदार कामगिरी केली. मुंबईने 7 पैकी 6 सामने जिंकले. मुंबई यासह सी ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानी राहिली.

मुंबई टीममधील बदल

निवड समितीने ऑलराउंडर अथर्व अंकोलकेर (बंड्या) आणि वेगवान गोलंदाज मोहित अवस्थी या दोघांना संधी दिली आहे. या दोघांचा चिन्मय सुतार आणि सिल्वेस्टर डिसोझा यांच्या जागी समावेश करण्यात आला आहे.

मुंबईसमोर कर्नाटकचं आव्हान

दरम्यान मुंबई उपांत्य पूर्व फेरीत कर्नाटक विरुद्ध भिडणार आहे. हा सामना 12 जानेवारीला होणार आहे.

बाद फेरीतील सामन्यासाठी मुंबई टीम :  सिद्धेश लाड (कर्णधार), सर्फराज खान, तुषार देशपांडे, शम्स मुलानी, मोहित अवस्थी, अथर्व अंकोलेकर, तनुश कोटीयन, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, अंगकृष रघुवंशी, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, ईशान मूलचंदानी, शशांक अत्तार्डे, ओंकार तरमाळे आणि साईराज पाटील

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...