World cup 2023: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नाही, ‘या’ राज्यात होऊ शकते वर्ल्ड कप 2023 ची फायनल

| Updated on: Nov 28, 2022 | 4:47 PM

World cup 2023: कुठल्या स्टेडियमवर होणार वर्ल्ड कप फायनल, पुन्हा एकदा त्यावरुन राजकारण रंगणार?

World cup 2023: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नाही, या राज्यात होऊ शकते वर्ल्ड कप 2023 ची फायनल
World cup 2023
Follow us on

मुंबई: T20 वर्ल्ड कपनंतर आता वनडे वर्ल्ड कपकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. पुढच्यावर्षी भारतात ही वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. याआधी 2011 साली वनडे वर्ल्ड कप स्पर्धा भारतात झाली होती. त्यावेळी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वर्ल्ड कप फायनलचा सामना रंगला होता. टीम इंडियाने श्रीलंकेला नमवून 2011 साली दुसऱ्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. आता पुढच्यावर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या निमित्ताने भारतात जोरदार तयारी सुरु आहे.

फायनल कुठे होणार?

वनडे वर्ल्ड कपचा यजमान भारत आहे. या वर्ल्ड कपच्या फायनलवरुन भारतात राजकारण रंगू शकतं. वनडे वर्ल्ड कपचा फायनल सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित होऊ शकतो. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलय.

सर्वाधिक प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता

नरेंद्र मोदी स्टेडियम वनडे वर्ल्ड कपची फायनल आयोजित करण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. अहमदाबाद येथे असलेलं हे स्टेडियम जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे. 1 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांना सामावून घेण्याची या स्टेडियमची क्षमता आहे.

आयपीएल फायनल इथेच झाली

राऊंड रॉबिन पद्धतीने 10 टीम्समध्ये ही वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. विजेत्या संघाला दोन पॉइंटस आणि ज्या मॅच होणार नाहीत, त्या टीम्सना एक-एक पॉइंट विभागून देण्यात येईल. आयपीएल 2022 ची फायनल नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाली. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ आमने-सामने होते. यावेळी सर्वाधिक प्रेक्षक वर्ग हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होता.