नताशाने मारला हार्दिक पांड्याला टोमणा, म्हणाली प्रेमात अपमान…

Hardik-natasa : विभक्त झाल्यानंतर नतासा तिच्या मूळ गावी, सर्बियाला निघून गेली आहे. ती तिचा 4 वर्षांचा मुलगा अगस्त्यला देखील सोबत घेऊन गेली आहे. हार्दिक पांड्या आता गायिका जास्मिन वालियाला डेट करत असल्याची चर्चा आहे. पण या दरम्यान नतासाची एक पोस्ट चर्चेत आहे.

नताशाने मारला हार्दिक पांड्याला टोमणा, म्हणाली प्रेमात अपमान...
| Updated on: Aug 27, 2024 | 6:27 PM

क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि सर्बियन अभिनेत्री-मॉडेल नताशा स्टॅनकोविच यांनी जुलैमध्ये विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. आता दोघे वेगळे झाले आहेत. पण दोघांच्या नात्यात दुरावा का आला हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. चर्चा अशी ही होती की, नताशा हार्दिकच्या व्यक्तिमत्त्वाशी ताळमेळ राखू शकली नाही कारण तो ‘खूप आत्ममग्न’ होता. आता नताशाने एक इंस्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

सोमवारी नताशाने एक पोस्ट पुन्हा शेअर केली की, “प्रेम सहनशील आहे. प्रेम दयाळू आहे. ते मत्सर नाही. ते बढाईखोर नाही. त्यात अनादर नाही. ते स्वार्थी नाही.” ते कोणत्याही वाईटात आनंदित नाही, परंतु नेहमीच रक्षण करते, प्रेम कधीही अपयशी ठरत नाही …”

कशामुळे झाला घटस्फोट?

टाईम्स नाऊच्या अलीकडील अहवालात म्हटले आहे की, नताशाने हार्दिकशी जुळवून घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परंतु सततच्या प्रयत्नांमुळे ती कंटाळली होती. एका सूत्राने सांगितले की, “हार्दिक खूप गर्विष्ठ होता. नताशाला ही वृत्ती सहन होत नव्हती. नताशाच्या लक्षात आले की दोघांच्या व्यक्तिमत्त्वात खूप फरक आहे. नताशाने हार्दिकशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. पण यामुळे नताशालाचा त्रास झाला.

नताशा आणि हार्दिक यांनी 31 मे 2020 रोजी लग्न केले आणि त्याच वर्षी 30 जुलै रोजी त्यांनी पहिला मुलगा अगस्त्याचे स्वागत केले. अनेक दिवस त्यांच्या घटस्फोटाची चर्चा होती. पण अखेर त्यांनी याबाबत जुलैमध्ये सोशल मीडियावर एक संयुक्त निवेदन जारी करत वेगळे झाल्याची माहिती सगळ्यांना दिली.

लग्नानंतर चार वर्षांनी वेगळे

“4 वर्ष एकत्र राहिल्यानंतर, हार्दिक आणि मी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आणि आमचे सर्वोत्कृष्ट एकत्रपणात दिले आणि आम्हाला विश्वास आहे की ते आपल्या दोघांच्या हितासाठी आहे.” आमच्यासाठी हा एक कठीण निर्णय होता, कारण आमचं कुटुंब वाढत असताना आम्ही एकत्र, परस्पर आदर आणि सहवास अनुभवत होतो.”

ते पुढे म्हणाले, “आम्हाला अगस्त्य आशीर्वाद म्हणून मिळाला आहे, जो आमच्या दोन्ही जीवनाच्या केंद्रस्थानी असेल आणि आम्ही त्याच्या आनंदासाठी आम्ही जे काही करू शकतो ते देतो याची खात्री करण्यासाठी आम्ही सहपालक आहोत या कठीण आणि संवेदनशील काळात आम्हाला गोपनीयतेची गरज आहे.