T20I World Cup 2026 : आणखी एकाचा नंबर, बॅटिंग ऑलराउंडर दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून आऊट

Icc T20i World Cup 2026 : भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा, श्रीलंकेचा ऑलराउंडर वानिंदु हसरंगा याच्यानंतर आणखी एकाचा दुखापतीने गेम केला आहे. दुखापतीमुळे ऑलराउंडरला उर्वरित वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावं लागलं आहे.

T20I World Cup 2026 : आणखी एकाचा नंबर, बॅटिंग ऑलराउंडर दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून आऊट
India vs New Zealand
Image Credit source: Bcci
| Updated on: Feb 10, 2026 | 11:26 PM

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत साखळी फेरीतील सामने खेळवण्यात येत आहे. आतापर्यंत 4 दिवसात 12 सामने खेळवण्यात आले आहेत. आता आणखी 9 दिवस दररोज प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहेत. या दरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. मात्र त्याआधी वाईट बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे बॅटिंग ऑलराउंडरला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील उर्वरित सामन्यांतून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे टीमच्या अडचणीत वाढ झाली आहे.

न्यूझीलंड क्रिकेट टीमने 10 व्या टी 20i वर्ल्ड कपमध्ये दणक्यात सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने अफगाणिस्तान आणि त्यानंतर यूएईवर मात केली. न्यूझीलंडने 10 फेब्रुवारीला यूएईचा 10 विकेट्नसने मात करत सलग दुसरा विजय साकारला. मात्र त्यानंतर न्यूझीलंडच्या गोटातून वाईट बातमी समोर आली आहे.

न्यूझीलंडचा बॅटिंग ऑलराउंडर मायकल ब्रेसवेल याला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलंय. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

मायक ब्रेसवेल याला त्याच्या डाव्या पोटरीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलंय. ब्रेसवेलला. टीम इंडिया विरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. ब्रेसवेल या दुखापतीतून सावरला होता. मात्र रविवारी 8 फेब्रुवारीला सराव करताना त्याला दुखापत झाली. त्यानंतर मेडीकल रिपोर्टनंतर ब्रेसवेलला दुखापत स्पष्ट झालं, अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे.

मायकल ब्रेसवेल याच्या जागी कुणाचा समावेश?

ब्रेसवेल याच्या जागी टीममध्ये कोल मॅक कॉन्ची याचा समावेश करण्यात आला आहे. मॅक आणि वेगवान याच्यासह भारतात दाखव होणार आहेत.

न्यूझीलंडचा तिसरा सामना केव्हा?

दरम्यान न्यूझीलंडने वर्ल्ड कप मोहिमेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात यूएईवर एकतर्फी आणि धमाकेदार विजय मिळवला.  न्यूझीलंडने यूएईचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला. त्यानंतर आता न्यूझीलंड सलग तिसरा सामना जिंकून सुपर 8 मध्ये अधिकृत प्रवेश मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.  न्यूझीलंड त्यांचा तिसरा सामना हा 14 फेब्रुवारीला खेळणार आहे. न्यूझीलंडसमोर या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका सामना जिंकत न्यूझीलंडला विजयी हॅट्रिकपासून करण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.