Captain | तिसऱ्या टी 20 सामन्याआधी टीमला झटका, कॅप्टन सीरिजमधून बाहेर, आयपीएलला मुकणार!

Cricket News | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे टीमचा कॅप्टन हा टी 20 सीरिजमधून तडकाफडकी बाहेर पडला आहे. त्यामुळे टीम अडचणीत सापडली आहे.

Captain | तिसऱ्या टी 20 सामन्याआधी टीमला झटका, कॅप्टन सीरिजमधून बाहेर, आयपीएलला मुकणार!
| Updated on: Jan 16, 2024 | 2:33 PM

मुंबई | आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या हिशोबाने क्रिकेट टीम जोरदार तयारी करत आहे. टीम इंडिया विरुद्ध अफगाणिनस्तान यांच्यात 3 सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तर मालिकेतील तिसरा सामना हा बुधवारी 17 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. हा सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या तिसऱ्या सामन्याआधी क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे.

एका बाजूला टीम इंडिया-अफगाणिस्तान यांच्यात टी 20 सीरिज सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात टी 20 मालिका होत आहे. या 5 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 2 सामने जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या दोन्ही सामन्यात पाकिस्तानच्या बाबर आझम याने चेजिंग करताना अर्धशतकी खेळी केली. मात्र पाकिस्तानला विजय मिळवून देता आला नाही.

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील तिसरा सामना हा बुधवारी 17 जानेवारी रोजी होणार आहे. या सामन्याआधी न्यूझीलंडला मोठा झटका लागला आहे. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमसन हा दुखापतीमुळे उर्वरित टी 20 सीरिजमधून बाहेर पडला आहे. आयसीसीने एक्सवरुन याबाबतची माहिती दिली आहे.

केनला पाकिस्तान विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात फलंदाजीदरम्यान अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे केन रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. विलियमनसला हॅमस्ट्रिंग इंजरी झाली आहे. दुर्देवाने केनच्या त्याच पायाला दुखापत झालीय, ज्या पायाला आयपीएल 2023 मध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे केनला कदाचित आयपीएलच्या 17 व्या मोसमालाही मुकावं लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

न्यूझीलंडला मोठा धक्का

टी 20 सीरिजसाठी टीम पाकिस्तान | आमेर जमाल, शाहीन अफ्रीदी (कर्णधार), सैम अयूब, मोहम्मद रिजवान, बाबर आझम, फखर जमान, इफ्तिखार अहमद, आजम खान (विकेटकीपर), उसामा मीर, अब्बास अफरीदी, हारिस रऊफ, मोहम्मद नवाज, अबरार अहमद, साहिबजादा फरहान, मोहम्मद वसीम जूनियर, हसीबुल्लाह खान आणि जमान खान.

न्यूझीलंड टीम | फिन एलन, डेवोन कॉनव्हे (विकेटकीपर), विल यंग, डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, मिचेल सेंटनर, एडम मिल्ने, टीम साउथी, ईश सोढी, बेन सियर्स, मॅट हेनरी आणि टीम सायफर्ट.