
मुंबई | आयसीसीने आगामी एकदिवसीय वनडे वर्ल्ड कप 2023 साठी मंगळवारी 27 जून रोजी वेळापत्रक जाहीर केलं. या स्पर्धेची सुरुवात 5 ऑक्टोबर तर शेवट 19 नोव्हेंबरला होणार आहे. एकूण 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 44 सामने खेळवण्यात येणार आहेत. एकूण 13 शहरांपैकी 10 शहरात मुख्य सामने पार पडतील. तर 3 शहरात सराव सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडिया 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे.
या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 10 संघ खेळणार आहेत. त्या 10 पैकी 8 संघ निश्चित झाले आहेत. तर उर्वरित 2 जागांसाठी झिंबाब्वेमध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप क्वालिफायर्स स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ खेळत आहेत. या 10 पैकी पहिले 2 संघ हे वर्ल्ड कप मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरलीत. सध्या ही स्पर्धा सुपर 6 फेरीपर्यंत पोहचली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत वेस्ट इंडिज टीमच्या निकोलस पूरन आणि झिंबाब्वेच्या सिंकदर रजा या खेळाडूंची चमकदार कामगिरी केलीय.
निकोलस पूरन सध्या तुफान फॉर्मात आहे. पूरनने आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप क्वालिफायर्स तुफानी खेळी केलीय. पूरनने नेपाळ विरुद्ध 115 आणि नेदरलँड्स विरुद्ध नाबाद 104 धावा केल्या. निकोलसचं हे या स्पर्धेतील दुसरं शतक ठरलं. तर झिंबाब्वेचा सिकंदर रजा बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी करतोय. पूरन आणि सिंकदरला या कामगिरीचा चांगलाच फायदा झाला आहे.
Significant gains for players performing in the #CWC23 Qualifier in the latest @MRFWorldwide ICC Men’s ODI Rankings ?
Details ?https://t.co/fTVeZTvw4F
— ICC (@ICC) June 28, 2023
आयसीसीने वनडे बॅटिंग रँकिंग जाहीर केली आहे. आयसीसीने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिलीय.या रँकिंगमध्ये पूरन आणि रजाला चांगला फायदा झालाय.
दरम्यान आयसीसीने जाहीर केलेल्या या वनडे बॅटिंग रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या विराट कोहली याला एका स्थानाने नुकसान झालंय. विराटची सातव्या स्थानावरुन आठव्या स्थानी घसरण झाली आहे. विराटच्या नावावर एकूण 719 रेटिंग्स आहेत. या वनडे रँकिंगमध्ये पहिल्या 10 फलंदाजामध्ये टीम इंडियाच्या 3 खेळाडूंचं समावेश आहे. यामध्ये विराट कोहली याला वगळता शुबमन गिल हा पाचव्या आणि रोहित शर्मा दहाव्या क्रमांकावर आहे.