CSKvsKKR IPL 2022: पहिल्या सामन्यासाठी संघ निवड धोनीसाठी सर्वात मोठी डोकेदुखी, तीन प्रमुख खेळाडूंशिवाय उतरणार

| Updated on: Mar 22, 2022 | 7:20 AM

CSKvsKKR IPL 2022: आयपीएल (IPL) स्पर्धा सुरु व्हायला आता फक्त काही दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या 26 मार्च रोजी गतविजेते चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये (CSK vs KKR) पहिला सामना होणार आहे.

CSKvsKKR IPL 2022: पहिल्या सामन्यासाठी संघ निवड धोनीसाठी सर्वात मोठी डोकेदुखी, तीन प्रमुख खेळाडूंशिवाय उतरणार
IPL 2022: चेन्नई सुपर किंग्स
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई: आयपीएल (IPL) स्पर्धा सुरु व्हायला आता फक्त काही दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या 26 मार्च रोजी गतविजेते चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये (CSK vs KKR) पहिला सामना होणार आहे. नेहमी प्रमाणे यंदाही CSK च्या संघाला विजेतेपदासाठी फेव्हरेट मानले जात आहे. पण धोनी समोर अडचणी कमी नाहीयत. कारण दुखापती, व्हिसा, दुसऱ्या देशांच्या सुरु असलेल्या सीरीज या धोनीसमोरच्या मुख्य अडचणी आहेत. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघ निवड करणे, सोपे नाहीय. एमएस धोनी यावर कशी मात करतो, ते पहावे लागेल. 26 मार्चला होणाऱ्या पहिल्या सामन्यात धोनीला आपल्या टॉप तीन खेळाडूंशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे. मोइन अली, दीपक चाहर आणि ड्वेन प्रिटोरियस हे ते तीन खेळाडू वेगवेगळ्या कारणांमुळे खेळू शकणार नाहीत. त्यामुळे धोनीला पर्यायी खेळाडू घेऊन खेळावे लागणार आहे.

मोइन अलीला व्हिसा कधी मिळणार?

मोइन अलीला अजून व्हिसा मिळालेला नाही. त्यामुळे तो पहिल्या सामन्याला मुकणार हे जवळपास निश्चित आहे. दीपक चाहर अद्याप दुखापतीमधून सावरलेला नाही. ड्वेन प्रिटोरियस हा दक्षिण आफ्रिकेची बांग्लादेश विरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर उपलब्ध होईल. त्यामुळे तो ही CSK च्या पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल.

दिलासा देणारी एकच बाब

दरम्यान यात चेन्नईसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे ऋतुराज गायकवाडचं फिट होणं. ऋतुराज गायकवाड पूर्णपणे फिट झाला असून तो पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध आहे. नव्याने चेन्नईच्या संघात घेण्यात आलेला डेवॉन कॉनवे त्याचा सलामीचा जोडीदार असणार आहे. सीएसकेच्या संघात नंबर तीन वर मोइन अलीच्या जागी रॉबिन उथाप्पा उतरेल.

कशी असेल बॅटिंग लाइन अप

मोइन अली नसल्यामुळे रॉबिन उथाप्पा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. अंबाती रायडू चार, रवींद्र जाडेजा पाचव्या, ऑलराऊंडर शिवम दुबे सहाव्या, डवेन ब्राव्हो आणि कर्णधार एमएस धोनी सातव्या आणि आठव्या नंबरवर फलंदाजीला येऊ शकतात.

राजवर्धनला संधी मिळणार?

गोलंदाजीमध्ये दीपक चाहरवर सीएसकेची प्रामुख्याने भिस्त होती. पण दुखापतीमुळे चाहर बाहेर आहे. त्यामुळे धोनी महाराष्ट्राच्या राजवर्धन हंगरगेकरला संधी देऊ शकतो. तो उपयुक्त फलंदाजीही करु शकतो. वानखेडेच्या खेळपट्टीवर चेंडू स्विंग होऊ शकतो. त्यामुळे एडम मिलने आणि ख्रिस जॉर्डनवरही धोनी विश्वास दाखवेल.