Udaipur murder: महाराष्ट्रात राजकीय संकट, राजस्थानात सामाजिक तणाव! इरफान पठाणचं उदयपूर हत्याकांडावर महत्त्वाचं विधान

| Updated on: Jun 29, 2022 | 12:15 PM

उदयपूर येथील हत्याकांडाने (Udaipur Murder) संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. दिवासढवळ्या दुकानात घुसून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली.

Udaipur murder: महाराष्ट्रात राजकीय संकट, राजस्थानात सामाजिक तणाव! इरफान पठाणचं उदयपूर हत्याकांडावर महत्त्वाचं विधान
udaipur murder
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई: उदयपूर येथील हत्याकांडाने (Udaipur Murder) संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. दिवासढवळ्या दुकानात घुसून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. कन्हैया लाल (kanhaiya lal) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. दोन आरोपींनी दुकानात घुसून अत्यंत क्रूर पद्धतीने त्याची हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण राजस्थान (Rajasthan) मध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. काही भागात इंटरनेट सेवाही बंद आहे. सर्वांनाच या निर्घृण हत्याकांडाने हादरवून सोडलय. चहूबाजुंनी या घटनेचा निषेध केला जातोय. माजी भारतीय क्रिकेटपटूनेही यावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठान आणि वेंकटेश प्रसाद यांनी उदयपूर हत्याकांडावर दु:ख व्यक्त केलं आहे. दोघांनी सर्वांनाच शांतत राखण्याच आवाहन केलं आहे.

वेंकटेश प्रसाद काय म्हणाला?

“उदयपूरमधली घटना खूपच दु:खद आहे. या कठीण काळात मी सर्वांना शांतता आणि संयम राखण्याच आवाहन करतो. कायद्याने कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे” असं वेंकटेश प्रसादने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

इरफान पठानलाही उदयपूर घटनेने हादरवून सोडलय. त्याने सुद्धा टि्वट करुन आपल्या भावना मांडल्या आहेत. “तुम्ही कशावर विश्वास ठेवता, याने फरक पडत नाही. कुठल्याही निर्दोष व्यक्तीला दुखावण हे संपूर्ण मानवतेला दुखावण्यासारख आहे” असं इरफान पठानने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

उदयपूर हत्याकांडाचं कारण काय?

कन्हैया लालच्या 8 वर्षाच्या मुलाने सोशल मीडियावर नुपूर शर्माच्या समर्थनाची पोस्ट केली होती. त्यामुळे काही लोक नाराज झाले होते. त्यांनी धारदार शस्त्रांनी त्या आठ वर्षाच्या मुलाचे पिता कन्हैया लाल यांची निर्घृण हत्या केली.