PAK vs BAN: मोहम्मद रिझवान नाचतो का? पाकिस्तानच्या पराभवानंतर दिग्गज खेळाडू संतापला

पाकिस्तान क्रिकेटची गेल्या काही वर्षात दूरवस्था झाली आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देता देता क्रिकेटचं वाटोळं करू टाकलं आहे. आता बांगलादेशने पहिल्या वनडे सामन्यात पाकिस्तानचा दारूण पराभव केला. या संघात स्टार विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवानही होता.

PAK vs BAN: मोहम्मद रिझवान नाचतो का? पाकिस्तानच्या पराभवानंतर दिग्गज खेळाडू संतापला
PAK vs BAN: मोहम्मद रिझवान नाचतो का? पाकिस्तानच्या पराभवानंतर दिग्गज खेळाडू संतापला
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 12, 2026 | 6:59 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तानच्या सुमार कामगिरीचं दर्शन घडलं. पाकिस्तानला सुपर 8 फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. आयसीसी जेतेपद शर्यतीतून पत्ता कट होणार हे जाहीर होतं. एक संधी होती पण त्यातही माती खाल्ली. असं असताना पाकिस्तानला पुन्हा एकदा रूळावर येण्यासाठी आता चांगलं क्रिकेट खेळण्याशिवाय पर्याय नाही. असं असताना बांग्लादेश दौऱ्यात पाकिस्तान संघाकडून खूप काही अपेक्षा आहेत. पण पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा दारूण पराभव झाला. बांगलादेशने वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात 8 विकेट राखून मात दिली. या पराभवानंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी दिग्गज क्रिकेटपटूंना खडे बोल सुनावले आहेत. यात माजी कर्णधार मोहम्मद रिझवान यालाही रडारवर घेतलं आहे. मोहम्मद रिझवानच्या फलंदाजीच्या शैलीवर एक माजी खेळाडूने आक्षेप घेतला आहे. खेळपट्टीवर का नाचतो? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

पाकिस्तानचा क्रिकेट संघ शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वात बांग्लादेश दौऱ्यावर गेला आहे. या संघात बाबर आझमला डावललं आहे. पण या मालिकेसाठी मोहम्मद रिझवानची संघात निवड केली आहे. पाकिस्तानने या सामन्यात 114 धावांची खेळी. पण बांगलादेशने 91 चेंडूतच हा सामना संपवला. त्यामुळे पाकिस्तान संघावर टीकेची झोड उठली आहे. पाकिस्तानला पराभवाची धूळ चारण्यात बांगलादेशचा वेगवान गोलंदाज नाहिद राणा हातभार लागला. त्याने पाच विकेट घेत पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं. मोहम्मद रिझवान यावेळी वेगवान गोलंदाजीचा सामना करताना अडचणीत आल्याचं दिसून आलं. त्यावरून माजी फलंदाज अहमद शहजादने त्याची खिल्ली उडवली.

मोहम्मद शहजाद म्हणाला की, ‘तो प्रत्येक वेळी तसाच आऊट होत आहे. वेगवान गोलंदाज समोर आला की नाचायला लागतो. त्याच्याकडे त्यांचा सामना करण्याचं कोणतंही तंत्र नाही.’ शहजादने केलेल्या टीकेचं अनेक जण समर्थन करत आहे. आकडेवारी पाहता तसंच म्हणावं लागेल. कारण या सामन्यात त्याने 20 चेंडूंचा सामना केला आणि 10 धावा करून बाद झाला. इतकंच काय तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 123 वेळा वेगवान गोलंदाजाचा सामना करताना बाद झाला. तसेच वेगवान गोलंदाजीसमोर त्याची सरासरी 32 ची आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us