PAK vs ENG: ‘पाकिस्तानात टॉयलेटमध्ये जातानाही….’ इंग्लंडच्या खेळाडूने सांगितला विचित्र अनुभव

पाकिस्तान टूरवर असलेल्या इंग्लंडच्या टीमला खतरनाक अनुभव येत आहेत.

PAK vs ENG: पाकिस्तानात टॉयलेटमध्ये जातानाही.... इंग्लंडच्या खेळाडूने सांगितला विचित्र अनुभव
england team
Image Credit source: twitter
| Updated on: Sep 21, 2022 | 4:28 PM

मुंबई: इंग्लंडची टीम सध्या पाकिस्तान टूरवर आहे. दोन्ही देशांमध्ये 7 टी 20 सामन्यांची सीरीज होणार आहे. पहिल्या मॅचमध्ये इंग्लंडने पाकिस्तानला धूळ चारली. या मॅचमध्ये इंग्लंडच्या एका खेळाडूने निर्णायक भूमिका बजावली. त्याचं वक्तव्य सध्या चर्चेमध्ये आहे. इंग्लिश खेळाडूच्या विधानावरुन पाकिस्तानात किती दहशत आहे, ते लक्षात येतं. खेळाडूंची मानसिक अवस्था काय आहे? ते सुद्धा यातून लक्षात येतं.

“पाकिस्तानात टॉयलेटमध्ये जातानाही सहज वाटत नाही. मनात एक भिती असते. याआधी कधी असं वाटलं नव्हतं” असं हॅरी ब्रुक म्हणाला. हॅरी इंग्लंडच्या मिडल ऑर्डरमधला फलंदाज आहे.

त्याने मॅच संपवली

काल 20 सप्टेंबरला कराचीमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंडच्या टीममध्ये मॅच झाली. त्याने 25 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 168 होता. हॅरीने 7 चौकार लगावले. त्याने मॅचमध्ये फिनिशरची भूमिका बजावली.

टॉयलेटला जाताना असं वाटतं की…

मॅच जिंकल्यानंतर हॅरी ब्रुक पाकिस्तानातल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल एक गोष्ट बोलून गेला. “मी टॉयलेटमध्ये जायचो, त्यावेळी असं वाटायचं की, कोणी माझा पाठलाग करतय. कोणी माझ्यामागे उभं आहे. याआधी मला कधी असं वाटलं नाही”

नासिर हुसैन काय म्हणाले?

ब्रुकच्या या विधानानंतर इंग्लंडचा माजी कॅप्टन नासिर हुसैनने भाष्य केलं. पाकिस्तानात इंग्लंडच्या खेळाडूंसोबत होत असलेल्या व्यवहारावर हुसैनने टिप्पणी केली. “पाकिस्तान फिरण्यासाठी एक चांगली जागा आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना फिरण्याची परवानगी नाही, हे लज्जास्पद आहे. त्यांना फक्त सुरक्षा घेऱ्यामध्ये ठेवलं जात आहे” असं नासिर हुसैन म्हणाले.

खेळाडूंवर परिणाम दिसतोय

नासिरच्या विधानावरुन पाकिस्तानातील परिस्थितीची कल्पना येते. पाकिस्तानच्या मनात किती भिती आहे. इंग्लिश खेळाडूंच स्वातंत्र्य त्यांनी हिरावून घेतलय. कुठल्याही खेळाडूबरोबर काही अप्रिय घडू नये, यासाठी सर्वोच्च काळजी घेतली जातेय. खेळाडूंवरही त्या सुरक्षा व्यवस्थेचा परिणाम दिसतोय.