तो 8 तास तडफडत होता, नंतर शेवटी…. भारतीय व्यक्तीसोबत कॅनडात भयंकर घडलं!
मूळच्या भारतीय असलेल्या प्रशांत नावाच्या एका 44 वर्षीय व्यक्तीसोबत कॅनडात भयंकर प्रकार घडल आहे. ही व्यक्ती आठ तास तडफडत होती.

Canada : अमेरिकेसारख्या देशात भारतीय तरुणाला गोळी घालून ठार केल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. परदेशी नागरिक म्हणून इतरही काही देशांत मूळच्या भारतीय नागरिकांवर वेगवेगळे अन्याय, अत्याचार केले जातात. या अत्याचाराच्या काही घटना समोर येतात तर काही घटनांना मात्र बाहेरच येऊ दिले जात नाही. सध्या कॅनडामधील भारतीय मूळ असणाऱ्या एका तरुणाचा उपचार वेळेवर न मिळाल्याने तडफून मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे तो तब्बल 8 तास हॉस्पिटलच्या वेटिंग रुममध्ये बसून होता. या घनटेनंतर आता कॅनडाचे प्रशासन, तेथील आरोग्य व्यवस्था तसेच कॅनडात भारतीयांना मिळणाऱ्या वागणुकीविषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव प्रशांत श्रीकुमार असे असून ते 44 वर्षांचे होते. कॅनडात त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. कॅनडातील के अॅडमॉन्टन येथे ही घटना घडली आहे. 22 डिसेंबर रोजी प्रशांत यांच्या छातीत तीव्र वेदना होत होत्या. रोजच्या कामावर असतानाच त्यांना हा त्रास जाणवत होता. परिस्थितीचे गंभीर्य लक्षात घेऊन त्यांना तत्काळ ग्रे नन्स कम्युनिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्यावर तत्काळ उपचार न करता त्यांना वेटिंग रुममध्ये बसा असे सांगण्यात आले.
उपचाराला नेत असतानाच…
प्रशांत यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितनुसार प्रशांत यांच्या छातीत खूप त्रास होत होता. त्यांना वेटिंग रुममध्ये बसण्यास सांगितले. जसा-जसा वेळ जात होता, तसे तसे प्रशांत यांचा रक्तदाब वाढत होता. सुरुवातीला त्यांना फक्त एक औषध देण्यात आले आणि बसण्यास सांगितले. साधारण आठ तास एका जागी बसवून ठेवल्यानंतर प्रशांत यांना उपचार करण्यासाठी नेले जात होते. पण ते लगेच कोसळले. नर्सेसने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचा तिथेच मृत्यू झाला.
दरम्यान, प्रशांत यांना एकूण तीन मुले आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर कॅनडातील आरोग्यव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तसेच कॅनडात मूळच्या भारतीयांना मिळणाऱ्या सुविधांवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
