AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs SL : साहिबजादाचं शतक-फखरची फटकेबाजी, पाकिस्तानच्या 212 धावा, सेमी फायनलसाठी श्रीलंकेला किती रन्सवर रोखावं लागणार?

Pakistan vs Sri Lanka Super 8 : पाकिस्तानच्या सलामी जोडीने श्रीलंकेविरुद्ध निर्णायक सामन्यात विस्फोटक बॅटिंग केली. त्यामुळे पाकिस्तानला 212 धावांपर्यंत पोहचता आलं. आता पाकिस्तानचे गोलंदाज श्रीलंकेला नेट रनरेटच्या हिशोबाने रोखतात का? याकडे लक्ष लागून आहे.

PAK vs SL : साहिबजादाचं शतक-फखरची फटकेबाजी, पाकिस्तानच्या 212 धावा, सेमी फायनलसाठी श्रीलंकेला किती रन्सवर रोखावं लागणार?
Sahibzada Farhan and Fakhar ZamanImage Credit source: Icc X account
| Updated on: Feb 28, 2026 | 9:29 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आतापर्यंत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर उपांत्य फेरीत पोहचणारा तिसरा संघ कोणता असणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. इंग्लंडने शुक्रवारी 27 फेब्रुवारीला न्यूझीलंडला पराभूत केलं. त्यामुळे न्यूझीलंडच्या सेमी फायनलच्या मोहिमेला झटका बसला. तर पाकिस्तानचं आव्हान कायम राहिलं. आता शनिवारी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पाकिस्तानने सुपर 8 मधील आपल्या तिसऱ्या आणि करो या मरो सामन्यात यजमान श्रीलंकेसमोर 213 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 212 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहचायचं असेल तर श्रीलंकेला 147 धावांपर्यंत रोखावं लागणार आहे.

न्यूझीलंडच्या खात्यात 3 गुण आहेत. तर न्यूझीलंडचा नेट रनरेट हा +1.390 असा आहे. त्यामुळे पाकिस्तानला सेमी फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी नेट रनरेटचं समीकरण जुळवावं लागणार आहे. पाकिस्तानने आता 212 धावा केल्या आहेत. त्यामुळे श्रीलंकेला 147 धावांच्या आत रोखलं तर पाकिस्तानच नेट रनरेट हा न्यूझीलंडपेक्षा जास्त होईल. पाकिस्तान अशाप्रकारे 3 गुणांसह उपांत्य फेरीत पोहचेल. तर न्यूझीलंडचं आव्हान संपुष्टात येईल. मात्र तसं झालं नाही तर पाकिस्तानचा जिंकूनही काहीच फायदा होणार नाही. श्रीलंकेने 148 धावा केल्या तर न्यूझीलंडचा सेमी फायनलमध्ये प्रवेश निश्चित होईल. त्यामुळे श्रीलंकेने 148 धावा कराव्यात, अशी पार्थना न्यूझीलंडचे खेळाडू करत असतील.  तर इथे पाकिस्तानच्या गोलंदाजांचा श्रीलंकेला 147 रन्सआधी रोखायचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आता या सामन्याचा काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाकिस्तानची बॅटिंग

श्रीलंकेने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानसाठी फखर झमान आणि साहिबजादा फरहान या दोघांनी 176 धावांची सलामी भागीदारी केली. फखर आऊट झाल्याने ही जोडी फुटली. फखरने 84 रन्स केल्या. तर साहिबजादा फरहान याने शतक झळकावलं. साहिबदाजा 100 धावा करुन आऊट झाला.

पाकिस्तानच्या सलामी जोडीने कडक सुरुवात दिली. मात्र त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी मोठी धावसंख्या करुन सामन्यावर घट्ट पकड मिळवायची संधी गमावली. श्रीलंकेने पाकिस्तानला शेवटच्या 12 चेंडूत 14 धावांच्या मोबदल्यात 6 झटके दिले. त्यामुळे पाकिस्तानला श्रीलंकेसमोर 8 विकेट्स गमावून 212 धावाच करता आल्या. आता या सामन्याचा काय निकाल लागतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या...

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या..

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !.

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक