AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs SL : पाकिस्तान सुपर 8 मधील दुसरा सामनाही पावसामुळे रद्द झाल्यास सेमी फायनलमध्ये पोहचणार? जाणून घ्या

Pakistan vs Sri Lanka Super 8 : पाकिस्तानचा सुपर 8 मधील पहिलाच सामना पावसामुळे वाया गेलाय. त्यामुळे पाऊस पाकिस्तानच्या सुपर 8 मधील तिसऱ्या सामन्यात विघ्न घालणार नाही ना? याची भीती चाहत्यांना सतावत आहे.

PAK vs SL : पाकिस्तान सुपर 8 मधील दुसरा सामनाही पावसामुळे रद्द झाल्यास सेमी फायनलमध्ये पोहचणार? जाणून घ्या
Pakistan vs Sri Lanka Super 8Image Credit source: PTI
| Updated on: Feb 28, 2026 | 12:33 PM
Share

इंग्लंडने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आपल्या सुपर 8 मोहिमेची सांगता विजयाने केली.इंग्लंडने शुक्रवारी 27 फेब्रुवारीला रंगतदार झालेल्या सामन्यात न्यूझीलंडवर मात करत सुपर 8 फेरीतील सलग आणि एकूण तिसरा विजय मिळवला. तर न्यूझीलंडने या पराभवासह सुरक्षितपणे सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी गमावली. इंग्लंडच्या विजयामुळे पाकिस्तानला मोठा दिलासा मिळाला. इंग्लंडच्या विजयामुळे आता पाकिस्तान या स्पर्धेत कायम राहिली आहे. त्यामुळे पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहचायचं असेल तर तर त्यांना त्यांच्या सुपर 8 फेरीतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवावा लागणार आहे.

पाकिस्तानचा पहिला सामना पावसामुळे वाया

पाकिस्तानचा सुपर 8 फेरीतील न्यूझीलंड विरुद्धचा सामना हा पावसामुळे वाया गेला. त्यामुळे पाकिस्तान आणि न्यूझीलंडला प्रत्येकी 1-1 गुण मिळाला. न्यूझीलंडने त्यानंतर श्रीलंकेवर मात केली. त्यामुळे न्यूझीलंडच्या खात्यात 3 गुण झाले. न्यूझीलंडला शुक्रवारी इंग्लंडवर मात करुन उपांत्य फेरी गाठण्याची संधी होती. मात्र न्यूझीलंडलने संधी दवडली. त्यामुळे आता पाकिस्तान श्रीलंकेवर मोठ्या फरकाने मात करुन सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी आशादायी आहे. मात्र पाकिस्तानचा श्रीलंकेविरुद्धचा सामनाही पावसामुळे वाया गेला तर काय? असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.

पाकिस्तान मोठ्या फरकाने जिंकणार?

पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहचायचं असेल तर श्रीलंकेविरुद्ध मोठ्या फरकाने जिंकावं लागेल. न्यूझीलंडच्या खात्यात 3 गुण आहेत. तर पाकिस्तानने हा सामना जिंकल्यास 3 गुण होतील. त्यामुळे दोन्ही संघांचे गुण बरोबर होतील. मात्र त्यानंतरही न्यूझीलंड नेट रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. त्यामुळे पाकिस्तानला या सामन्यात फक्त जिंकून काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्ध नेट रनरेटचं समीकरण डोक्यात ठेवून मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.

त्यामुळे हा सामना पावसामुळे किंवा इतर कारणामुळे रद्द झाला तर पाकिस्तानचे 2 गुण होतील त्याशिवाय दुसरं तिसरं काहीच होणार नाही. तसेच यासह पाकिस्तानचं पॅकअप होईल आणि न्यूझीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.

पाकिस्तानला किती फरकाने जिंकावं लागणार?

दरम्यान पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी श्रीलंकेविरुद्ध किती फरकाने जिंकावं लागणार? हे समजून घेऊयात. पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी श्रीलंकेविरुद्ध 65 धावांनी किंवा 13 ओव्हरमध्ये हा सामना जिंकावा लागेल. त्यामुळे पाकिस्तान काय करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...