Abrar Ahmed dropped: अबरार अहमदला केलं संघाबाहेर, धक्कादायक निर्णयाची चर्चा

Bangladesh vs Pakistan, 2nd ODI: पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा वनडे सामना सुरू आहे. या सामन्यातून मिस्ट्री फिरकीपटू अबरार अहमद याला वगळण्यात आलं आहे. चला जाणून घेऊयात काय झालं ते...

Abrar Ahmed dropped: अबरार अहमदला केलं संघाबाहेर, धक्कादायक निर्णयाची चर्चा
Abrar Ahmed dropped: अबरार अहमदला केलं संघाबाहेर, धक्कादायक निर्णयाची चर्चा
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 13, 2026 | 3:09 PM

Bangladesh vs Pakistan Abrar Ahmed: पाकिस्तानचा मिस्ट्री फिरकीपटू याला काव्या मारन यांच्या फ्रेंचायझीने द हंड्रेड लीग स्पर्धेत चांगला भाव दिला. त्यामुळे 2009 नंतर भारतीय फ्रेंचायझीने विकत घेतलेला पहिला खेळाडू ठरला. असं असताना त्याला आनंदाच्या बातमीनंतर दुसऱ्या दिवशीच धक्का बसला आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यातून त्याला वगळण्यात आलं. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं. हा सामना ढाकाच्या शेरे बांग्ला स्टेडियममध्ये होत आहे. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीने त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आणि हारिस रऊफला संधी दिली. अबरार अहमद हा पाकिस्तानचा विकेट टेकर गोलंदाज आहे. असं असूनही त्याला बाहेर काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात..

अबरार अहमदला म्हणून बसवलं…

शेरे बांग्ला स्टेडियममधील खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे अबरारला बसवून हारिस रऊफला संधी दिली गेली. याच खेळपट्टीवर मागच्या सामन्यात बांगलादेशचा वेगवान गोलद नाहिद राणाने पाच विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानचा संपूर्ण संघ 114 धावांवर बाद झाला. इतकंच काय तर बांगलादेशने फक्त 91 चेंडूत हे लक्ष्य गाठलं. या सामन्यात अबरार अहमदचं 3 षटकात 25 धावा दिल्या होत्या. त्यामुळे खेळपट्टीचा अंदाज घेत शाहित शाह आफ्रिदीने हारिस रऊफला संधी दिली आहे. दरम्यान, दुसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शाहिन शाह आफ्रिदीने नाणेफेक गमावला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या वाटेला पुन्हा फलंदाजी आली आहे.

शाहीन आफ्रिदी म्हणाला की, ही एक चांगली विकेट आहे. हिरवीगार, कठीण विकेट दिसते. फलंदाजांना त्यांची चूक माहित आहे, ते अधिक जोमाने येतात आणि या ट्रॅकवर स्वतःचे शॉट्स खेळतात. मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. सध्याच्या काळात कोणीही भूमिका बजावू शकते. परंतु मला वाटते की आम्ही शेवटच्या सामन्यात चांगली सुरुवात केली आणि आशा आहे की आम्ही मधल्या षटकांमध्ये चांगले खेळून मोठी धावसंख्या गाठू. एक बदल केला आहे. हरिस रऊफ परतला आहे आणि अबरार अहमद विश्रांती घेत आहे.

Follow Us