पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी क्रिकेट संघाला दिलेला चेक झाला बाउंस, धक्कादायक माहिती आली समोर

पाकिस्तान हा देश पूर्णपणे भिकेला लागलेला आहे. त्यात आता नवीन असं काही नाही. पण त्याची सुरुवात ही 10-15 वर्षाआधीच झाली होती. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपूटने हा धक्कादायक खुलासा केला आहे. एक पॉडकास्टमध्ये सईद अजमलने सत्यस्थिती मांडली.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी क्रिकेट संघाला दिलेला चेक झाला बाउंस, धक्कादायक माहिती आली समोर
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी क्रिकेट संघाला दिलेला चेक झाला बाउंस, धक्कादायक माहिती आली समोर
Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Sep 30, 2025 | 4:07 PM

आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानचं नाक कापलं गेलं. एक काळ असा होता की क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा वरचष्मा होता. पण भविष्यातील क्रिकेटपटू घडवण्याऐवजी दहशतवादी घडवण्यात सर्व काही घालवलं. आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेटची किती वाताहत झाली आहे हे दिसून आलं. पाकिस्तानी क्रिकेटपट पुरते हतबल झाल्याचं पाहायला मिळालं. अंतिम सामन्यात तर भारताने पाकिस्तानच्या तोंडून विजयाचा घास खेचून आणला. भारताने या स्पर्धेत पाकिस्तानला सलग तीनदा पराभूत केलं. त्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने माज दाखवत चेक देखील फेकला होता. असं असातना माजी क्रिकेटपटू सईद अजमल याने धक्कादायक खुलासा केला आहे. 2009 टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर काय झालं होतं? त्याबाबत सांगितलं. तेव्हाच्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संघाला मूर्खात काढलं होतं. तेव्हा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची धुरा युसूफ रजा गिलानी यांच्याकडे होती आणि त्यांनी दिलेला चेक बाउंस झाला होता.

सईद अजमलने एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की, ‘2009 चा टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर आम्हाला फारसा भाव मिळाला नाही. कारण त्यानंतर आम्हाला श्रीलंकेविरुद्ध खेळायचे होते. तत्कालीन पंतप्रधानांनी आम्हाला फोन केला आणि प्रत्येकी 25 लाख रुपयांचे चेक दिले. आम्ही खूप आनंदी होतो. कारण मिळालेली रक्कम खूपच मोठी होती. पण आमचे चेक बाउन्स झाले. सरकारी चेक बाउन्स झाले. त्यानंतर सांगितले की पीसीबी प्रमुख तुम्हाला चेक देतील. पण अध्यक्षांनी स्पष्टपणे नकार दिला आणि म्हटले की ते ते कुठून आणणार. आम्हाला जे काही पैसे मिळाले ते आयसीसीकडून आले. त्यानंतर, श्रीलंका दौऱ्यावर पाकिस्तान संघाचा वाईट पराभव झाला.’

भारताने 2007 टी20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर दुसऱ्या पर्वात पाकिस्तानने पुन्हा अंतिम फेरी गाठली आणि श्रीलंकेचा पराभव केला. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 138 धावा केल्या होत्या. हे लक्ष्य पाकिस्तानने 8 चेंडू आणि 2 गडी गमवून पूर्ण केलं होतं. या सामन्यात शाहिद आफ्रिदीने नाबाद 54 धावांची खेळी केली होती. तर कामरान अकमलने 37 धावा केल्या होत्या. तर शोएब मलिक नाबाद 24 धावांवर होता. पण इतकी मोठी कामगिरी करूनही पाकिस्तानच्या हाती कटोरा आला. पाकिस्तानला तेव्हापासून भिकेचे डोहाळे लागले होते. त्यामुळे आता पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या पूर्णपण रसातळाला गेला आहे.