पाकिस्तानने परत एकदा खाल्ली माती! बाबर गेल्यावरही परत तीच चूक, पाक चाहतेही संतापले

Pakistan Test Team : वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदी नव्या कर्णधाराची निवड झाली आहे. पाकिस्तान संघाची ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी असणार आहे. मात्र संघ जाहीर करताना दुबळा संघ निवडल्याचं बोललं जात आहे. त्यासोबतच स्टार खेळाडूला संघात जागी दिली गेली नाही.

पाकिस्तानने परत एकदा खाल्ली माती! बाबर गेल्यावरही परत तीच चूक, पाक चाहतेही संतापले
Pakistan Team (3)
| Updated on: Dec 13, 2023 | 6:08 PM

मुंबई : वर्ल्ड कप 2024 नंतर पाकिस्तान संघ पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उतरत आहेत. वर्ल्ड कपमधील पाकिस्तान संघाच्या खराब प्रदर्शनामुळे बाबर आझम याने क्रिकेटमधील तिन्ही प्रकारच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कसोटी क्रिकेटसाठी शान मसूद याच्याकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या सामन्यासाठी जो संघ जाहीर केला आहे त्यामध्ये स्टार खेळाडूल बाहेर बसवण्याचा निर्णय पाकच्या टीम मॅनेजमेंटने घेतला आहे.

पाकिस्तानचा मॅचविनरलाच केलं बाहेर

पाकिस्तान संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी आपल्या प्लइेंग 11 ची घोषणा केली आहे. यामध्ये आमिर जमाल आणि खुर्रम शहजाद यांना स्थान देण्यात आलं आहे. दोन्ही गोलंदाज पर्थमधील कसोटीमध्ये पदार्पण करणार आहेत. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीमध्ये शाहिन आफ्रिदी हा एकटाच अनुभवी गोलंदाज असणार आहे. नसीम शहा आणि हॅरिस रॉफ यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांना संघाता स्थान देण्यात आलं आहे.

पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ

प्लेइंग इलेव्हन: इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (C), बाबर आझम, सौद शकील, आगा सलमान, सर्फराज अहमद (WK), फहीम अश्रफ, शाहीन शाह आफ्रिदी, आमेर जमाल, खुर्रम शहजाद

पाकिस्तान संघात स्टार खेळाडू विकेटकीपर मोहम्मद रिझवानला जागा दिली गेली नाही. त्याच्या जागी सर्फराज अहमद याची निवड करण्यात आली आहे. टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयावर पाकिस्तानचे क्रिकेट चाहतेही नाराज  झालेत. कारण मोहम्मद रिझवानसारख्या खेळाडूला बसवण्याचा निर्णय घेतल्याने संघात राजकारण चालत असल्याची चर्चा होताना दिसत आहे. बाबर आझम कर्णधार असताना रिझवानची जागा संघात कायम असायची. मात्र बाबर कर्णधारपदी नाहीतर लगेच रिझवानला बाहेर काढल्याचं उघडपणे क्रिकेटप्रेमी बोलत आहेत.

पाकिस्तान संघ: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद (C, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (W), आगा सलमान, फहीम अश्रफ, हसन अली, मीर हमजा, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, खुर्रम शहजाद, आमेर जमाल, नोमान अली, सैम अयुब, अबरार अहमद, सर्फराज अहमद