Asia Cup 2023 | आशिया कप स्पर्धेआधी या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

Asia Cup 2023 | आशिया कप 2023 स्पर्धेआधी स्टार क्रिकेटरने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे टीमला मोठा झटका लागला आहे.

Asia Cup 2023 | आशिया कप स्पर्धेआधी या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
ind vs pak world cup 2023
| Updated on: Jun 15, 2023 | 5:59 PM

मुंबई | आशिया कप आयोजनाचा वाद अनेक महिन्यांपासून रंगला आहे. आशिया कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाला. मात्र आमचे खेळाडू पाकिस्तानमध्ये खेळायला येणार नाहीत, अशी भूमिका बीसीसीआयने घेतली. आता अनेक महिन्यांच्या वादानंतर आणि बैठकानंतर या स्पर्धेच्या आयोजनावरुन तोडगा काढण्यात आला आहे. तसेच या आशिया स्पर्धेसाठी पाकिस्तानने हायब्रिड मॉडेल स्वीकार करण्यात आला आहे. या सर्व दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. एका स्टार क्रिकेटरने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना झटका लागला आहे.

पाकिस्तान महिला क्रिकेट टीमची फलंदाज नाहिदा खान हीने 14 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीनंतर थांबायचा निर्णय घेतलाय. नाहिदाने निवृत्तीची घोषणा केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. नाहिदाने 7 फेब्रुवारी 2009 रोजी श्रीलंका विरुद्ध एकदिवसीय पदार्पण केलं होतं. नाहिदा ही पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करणारी बलूचिस्तानची एकमेव महिला क्रिकेटपटू होती.

तब्बल 7 वर्ल्ड कप खेळण्याचा अनुभव

नाहिदा हीने देशासाठी तब्बल 7 वर्ल्ड कप खेळला आहेत. यामध्ये 3 वनडे आणि 4 टी 20 वर्ल्ड कप स्पर्धांचा समावेश आहे. नाहिदा ही 2013,2017 आणि 2022 या वनडे वर्ल्ड कप टीमचा भाग होती. तर टी 20 वर्ल्ड कप 2012, 2014, 2016 आणि 2018 या 4 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं. कराचीमध्ये पाकिस्तान कप महिला क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करणयात आलं होतं. या स्पर्धेत नाहिदाने कोचिंग क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

नाहिदा खान हीचा क्रिकेटला अलविदा

नाहिदाची क्रिकेट कारकीर्द

नाहिदाने 120 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलंय. नाहिदाने या सामन्यांमध्ये एकूण 2 हजार 14 धावा केल्या आहेत. तसेच 1 विकेटही घेतली आहे. पाकिस्तानने 2018 मध्ये दांबुला इथे श्रीलंका विरुद्ध 94 धावांनी विजय मिळवला होता. नाहिदा हीने या सामन्यात 4 कॅच घेत वनडेत सर्वाधिक कॅच घेण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला होता.

नाहिदा निवृत्तीबाबत काय म्हणाली?

“मला माझ्या संपूर्ण कारकीर्दीत मिळालेल्या पाठींब्यासाठी आभारी आहे. कुटुंबाचं, सहकाऱ्यांचं,प्रशिक्षक आणि पीसीबीचे आभार मानते. पीसीबीने मला मार्गदर्शन केलं आणि माझ्यावर विश्वाला दाखवला यासाठी मी त्यांचे आभारी आहे. मी त्या क्रिकेट चाहत्यांची आभारी आहे, ज्यांनी मला कायमच पाठिंबा दिला.”, असं नाहिदाने म्हटलं.