Video : सॅम कोनस्टाससोबत सेल्फी काढण्यासाठी गाडी पार्क करून धावा घेतली, पण…

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतून ऑस्ट्रेलिया संघात पदार्पण करणाऱ्या सॅम कोनस्टासने अल्पावधीतच नावलौकिक मिळवला आहे. सॅमने विराट कोहलीने मारलेल्या धक्क्यानंतर जसप्रीत बुमराहशी वाद घातला होता. त्यामुळे त्याचे अनेक चाहते झाले असून त्याच्यासोबत फोटोसाठी काय करतील याचा नेम राहिलेला नाही.

Video : सॅम कोनस्टाससोबत सेल्फी काढण्यासाठी गाडी पार्क करून धावा घेतली, पण...
| Updated on: Jan 16, 2025 | 5:43 PM

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघात पदार्पण करणारा सॅम कोनस्टास पहिल्याच खेळीत चमकला. पहिल्या डावात त्याने अर्धशतकी खेळी केली. तसेच जसप्रीत बुमराहला दोन षटकार ठोकत आपला आक्रमक पवित्रा दाखवून दिला. या सामन्यात विराट कोहलीने त्याला खांद्याने धक्का दिला होता. पण इथपर्यंत सर्वकाही थांबलं नाही. सॅम कोनस्टासने सुद्धा जसप्रीत बुमराह आणि यशस्वी जयस्वालला त्रास देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.  नॉन स्ट्रायकर एन्डला असताना शेवटचं षटक टाकत असलेल्या जसप्रीत बुमराहाला डिवचलं. पण पुढच्या चेंडूवर बुमराहाने ख्वाजाची विकेट काढली. तर फलंदाजी करत असलेल्या यशस्वी जयस्वालला जवळ उभा राहून डिवचत होता. त्यामुळे सॅम कोनस्टास अल्पावधीतच स्टार झाला आणि त्याचे अनेक चाहते झाले. त्याचा फॅनबेस त्याच्यासाठी आता इतका वेडा झाला आहे की काय करतो याचंही भान राहात नसल्याचं दिसत आहे. अशाच एका चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कॉनस्टास त्याच्या बॅटिंग किटसह रस्त्यावरून जात होता. नेमकं त्याच्या चाहत्याने त्याला पाहिलं आणि हातात आलेली संधी सोडून कसं चालेल म्हणून घाई गडबडीत गाडी पार्क केली. तसेच गाडीचा दरवाजा खोलून त्याच्याकडे धाव घेतली. पण या सर्व घडामोडीत हँडब्रेक खेचायला विसरून गेला. मग काय गाडीने पुढे सरकली आणि उभ्या असलेल्या दुसऱ्या गाडीला ठोकली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या नेटकऱ्यांनी कॉनस्टास इफेक्ट असं नाव दिलं आहे.

बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये दिसलेल्या सॅम कोनस्टासने आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पदार्पणाच्या मालिकेत त्याने 1 अर्धशतकासह 113 धावा केल्या. सध्या 19 वर्षीय सॅम कोनस्टास ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळत आहे. या युवा फलंदाजाने सिडनी थंडरसाठी दोन अर्धशतके झळकावली.सॅम कोनस्टासने हाच फॉर्म कायम ठेवल्यास आगामी काळात ऑस्ट्रेलियाच्या टी20 संघात स्थान मिळेल, यात शंका नाही.