AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs PBKS : 6,6, कॅप्टन ऋषभ पंतचा एकहाती षटकार, मार्को जान्सेनची धुलाई, एका ओव्हरमध्ये किती धावा? पाहा व्हीडिओ

Rishab Pant One Handed Six Video: लखनौचा कॅप्टन ऋषभ पंत याने एकहाती मारलेला षटकाराची सोशल मीडियावर एकच चर्चा पाहायला मिळत आहे. पंतने सलग 2 चेंडूत 2 षटकार लगावले. पाहा व्हीडिओ.

LSG vs PBKS : 6,6, कॅप्टन ऋषभ पंतचा एकहाती षटकार, मार्को जान्सेनची धुलाई, एका ओव्हरमध्ये किती धावा? पाहा व्हीडिओ
Rishabh Pant One Handed Six On Marco Jansen BowlingImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 19, 2026 | 11:24 PM
Share

पंजाब किंग्सने रविवारी 19 एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. प्रियांश आर्य आणि कुपर कोनोली या दोघांनी केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर पंजाबने घरच्या मैदानात लखनौ सुपर जायंट्ससमोर 250 पार मजल मारली. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 254 धावा केल्या. विजयी धावांचा पाठलाग करताना लखनौने सुपर सुरुवात केली. मिचेल मार्श आणि आयुष बडोनी या दोघांनी पावरप्लेच्या पहिल्या 6 षटकांत 61 धावा जोडल्या. आयुषच्या रुपात लखनौने पहिली विकेट गमावली. आयुषने 35 धावा केल्या. त्यानंतर कॅप्टन ऋषभ पंत मैदानात आला. पंतने पहिल्याच ओव्हरमध्ये कमाल केली. पंतने मार्को यान्सेनसारख्या उंचपुऱ्या गोलंदाजांसमोर एकहाती षटकार लगावले. पंतने या ओव्हरमध्ये एकूण 2 षटकार लगावले. पंतच्या या फटकेबाजीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ऋषभ पंत त्याच्या उलटसुलट आणि अतरंगी फटकेबाजीसाठी ओळखळा जातो. मात्र पंतला या मोसमात एका खेळीचा अपवाद वगळता आतापर्यंत आपल्या लोकीकौला साजेशी खेळी करता आली नव्हती. मात्र पंत पंजाबसमोर 255 धावांचा पाठलाग करताना कसं आणि किती योगदान देतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र पंतने चाहत्यांची निराशा केली नाही. पंतने यान्सेनची धुलाई करत एकाच ओव्हरमध्ये 2 षटकार लगावले.

लाईव्ह स्कोअर

मार्को यान्सेन याने टाकलेल्या लखनौच्या डावातील सातव्या षटकातील पहिल्या चेंडूवर मिचेल मार्श याने 1 धाव घेतली. त्यामुळे पंत स्ट्राईकवर आला. पंतने एक धाव घेत मार्शला स्ट्राईक दिली. मार्शने पुन्हा तेच केलं. मार्शने 1 धाव घेतली. त्यामुळे पंत पुन्हा स्ट्राईकवर आला. त्यानंतर पंतने धमाका केला. पंतने चौथ्या आणि पाचव्या बॉलवर मार्को यान्सेनला सलग 2 षटकार लगावले.

ऋषभ पंतचा एकहाती सिक्स, मार्को जान्सेनची धुलाई

एका ओव्हरमध्ये 2 सिक्ससह 15 धावा

पंतने मारेलला पहिला सिक्स हा 79 मीटर दूर गेला. त्यानंतर पंतने मारलेला दुसरा षटकार हा पहिल्या सिक्सच्या तुलनेत आणखी 10 मीटर दूर गेला. पंतने मारलेला दुसरा सिक्स हा 89 मीटर इतका लांब गेला. मात्र यान्सेनने ओव्हरमधील सहाव्या आणि शेवटच्या बॉलवर एकही धाव दिली नाही. अशाप्रकारे मार्श आणि पंत या दोघांनी यान्सेनच्या ओव्हरमध्ये एकूण 15 धावा मिळवल्या.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...