IND vs SL : टीम इंडियाचा दमदार विजय, श्रीलंकेवर 5 विकेट्सने मात

PD Champions Trophy 2025 IND vs SL : टीम इंडियाने विक्रांत केणी याच्या नेतृत्वात श्रीलंकेवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा हा साखळी फेरीतील पाचवा विजय ठरला.

IND vs SL : टीम इंडियाचा दमदार विजय, श्रीलंकेवर 5 विकेट्सने मात
pd 2025 ind vs sl
Image Credit source: dcciofficial x account
| Updated on: Jan 19, 2025 | 7:18 PM

भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना जिंकला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेवर 5 विकेट्सने विजय मिळवला. पावसामुळे 15 षटकांचा सामना खेळवण्यात आला. श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी 84 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 3 ओव्हरआधीच पूर्ण केलं. टीम इंडियाने 12 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 85 धावा केल्या. टीम इंडियाचा हा साखळी फेरीतील 6 सामन्यांमधील पाचवा तर श्रीलंकेविरुद्धचा दुसरा विजय ठरला.

टीम इंडियाची बॅटिंग

टीम इंडियाकडून माजिद मरग्रे याने सर्वाधिक धावा केल्या. माजिद मरग्रेने 22 चेंडूत नाबाद 32 धावांची विजयी खेळी केली. तर श्रीलंकेकडून आमिर हसन याने 7 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. त्याआधी श्रीलंकेने 15 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 83 धावा केल्या. श्रीलंकेसाठी थरिंदू थिवंका याने 28 बॉलमध्ये 32 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून आमिर हसन याने 7 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाची साखळी फेरीतील कामगिरी

दरम्यान टीम इंडियाने या साखळी फेरीत पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका आणि पुन्हा पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवला. टीम इंडियाने पाकिस्तानने सलग दुसऱ्यांदा पराभूत करत विजयी चौकार लगावला. मात्र त्यानंतर इंग्लंडने 18 जानेवारीला पराभूत करत पहिल्या पराभवाचा वचपा घेतला आणि टीम इंडियाचा विजय रथ रोखला. त्यानंतर आता टीम इंडियाने 19 जानेवारीला श्रीलंकेचा पराभव करत या साखळी फेरीचा शेवट विजयाने केला.

टीम इंडियाचा पाचवा विजय, श्रीलंकेवर 5 विकेट्सने मात

दरम्यान टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे टीम इंडिया पीडी टी 20 चॅम्पियन्स ट्रॉफीपासून एक सामना दूर आहे. टीम इंडिया अंतिम सामना मंगळवारी 21 जानेवारीला होणार आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : विक्रांत केणी (कर्णधार), रवींद्र संते (उपकर्णधार), योगेंदर भरोदिया, आकाश पाटील, राजेश कन्नूर, नरेंद्र मंगोरे, जितेंद्र व्ही एन, कुणाल फणसे, निखील मनहास, माजिद मरग्रे आणि आमिर हसन.