AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या दरवाजापर्यंत युद्ध पोहचले,इराणी युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, भारताला धोका ? तज्ज्ञांची भीती काय?

पाकिस्तानने सौदी अरब सोबत संरक्षण करार केला आहे त्यामुळे आता युद्धात उतरण्याची धमकी इराणला दिली आहे. दुसरीकडे भारताच्या आमंत्रणावरुन आलेल्या इराणच्या युद्धनौकेला अमेरिकेने टार्गेट केल्याने युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारताच्या दरवाजापर्यंत युद्ध पोहचले,इराणी युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, भारताला धोका ? तज्ज्ञांची भीती काय?
iris dena warship
| Updated on: Mar 05, 2026 | 7:23 PM
Share

इराण आणि अमेरिका-इस्राईल यांच्या दरम्यान सुरु असलेले युद्धाची धग आता हिंदी महासागरापर्यंत आली आहे. हा भारतासाठी सामरिक धोरणात्मक दृष्ट्या महत्वपूर्ण भाग मानला जात आहे. मंगळवारी श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात अमेरिकन पाणबुडीने इराणच्या विनाशिका आयआरआयएस डेनाला टॉरपीडो क्षेपणास्र डागून बुडवले आहे. द्वितीय जागतिक महायुद्धानंतर प्रथमच अमेरिकेने टॉरपिडोने शत्रूचे जहाज बुडवले आहे.

आयआरआयएस डेनाला भारता संयक्त नौदल कवायतींसाठी आली होती. आणि त्यानंतर ही युद्धनौकाल परतीच्या प्रवासाला लागली असताना तिच्यावर हा हल्ला अमेरिकेने केला आहे. या दरम्यान, पाकिस्तानने देखील सौदी अरब सोबत संरक्षण करार केल्याने तो इराण संघर्षात ओढला जाऊ शकतो असे संकेत दिले आहेत. या घटनांमुळे भारतीय उपमहाखंड आणि दक्षिण आशियाई समुद्री क्षेत्रातील स्थिरतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

आयआरआयएस डेनाने १८ ते २५ फेब्रुवारी दरम्यान बंगालच्या खाडीत झालेल्या भारताच्या मिलन आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्हूयमध्ये सहभाग घेतला होता. या युद्धनौकेला भारतीय नौदलाने खास आमंत्रित केले होते. ही युद्धनौका आंध्रप्रदेशातील विशाखापट्टनमहून परतत होती. तेव्हा आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात या युद्धनौकेला अमेरिकन पाणबुडीने हिंद महासागरात लक्ष्य केले आहे.

इराण युद्धनौकेवरील हल्ल्यात ८० जणांचा मृत्यू –

रिपोर्टनुसार इराणच्या युद्धनौकेवरील ८० लोकांचा मृत्यू झाला आहे. श्रीलंकन नौदलाने आतापर्यंत ३० खलाशाने वाचवले आहे. त्यांना गाले येथील करापिटियाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.वायुदलाच्या मदतीने अजूनही शोध मोहिम सुरु आहे. ही कारवाई समुद्र कायदा युएन क्लोसअंतर्गत श्रीलंकेने आपली जबाबदारी घेतली आहे. समुद्र संकटात अडकलेल्या जहाजांना मदत करणे हे किनारी भागातील देशांचे कर्तव्य आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्राईलने इराणवर हवाई हल्ले सुरु केले होते. यानंतर इराण ड्रोन आणि मिसाईलने हल्ले करत आहेत. यामुळे संपूर्ण पश्चिम आशियात तणाव पसरला आहे.

हिंद महासागरात अमेरिकेची उपस्थिती –

आयआरआयएस डेना युद्ध नौकेवरील हल्ला हा हे या गोष्टीचा संकेत आहे की हिंद महासागरात अमेरिकन नौदलाची मजबूत उपस्थिती राहणार आहे. हा भाग अमेरिकेच्या पाचव्या सागरी आरमाराच्या घेऱ्यात येते. ज्याचे मुख्यालय बहारीन येथे आहे. येथे नेहमीच युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुड्या असतात. टॉरपिडो हल्ल्यात जहाजाचा खालचा भाग तुटला आहे. यामुळे बचाव दलाला तेथे केवळ तेलाचा थर सापडला. जहाजाचा कोणताही भाग सापडला नाही.

भारतासाठी का महत्वाचे ?

अमेरिकेचा हा हल्ला भारताच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या हद्दीच्याजवळ घडला आहे. भारताने अमेरिकेला सांगायला हवे की तुम्ही समुद्री युद्ध आमच्या दरवाजापर्यंत आणले आहे असे माजी नौदल प्रमुख एडमिरल अरुण प्रकाश यांनी म्हटले आहे. इराणच्या क्षेपणास्रांनी अमेरिकन नौदलाला भारतीय समुद्री सीमेजवळ आणले आहे. कदाचित अशाच कोणत्या परिस्थितीसाठी अमेरिकेने भारता सोबत २०१६ मध्ये LEMOA ( logistics agreement ) करार केला होता.

मात्र, आता अमेरिकेने कोणत्याही आगळीकी शिवाय सुरु केलेल्या या युद्धाचे भारताला काही घेणे देणे नसतानाही त्याचे धोकादायक परिणाम भोगावे लागू शकतात. यावेळी भारत सरकारला भारतीय हितांचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्रपणे आणि समजदारीने पावले उचलायला हवीत. ही घटना इराण संकटात आपण ओढले जाण्याची शक्यता वर्तवत आहे असा इशारा संरक्षण तज्ज्ञ नितीन गोखले यांनी दिला आहे.

काँग्रेस नेते पवन खेडा यांनी सवाल केला आहे की भारताचे आपल्या शेजारी कोणतेही प्रभाव क्षेत्र उरले नाही का ? हा हल्ला भारतीय सागरी हद्दीत झालेला नाही. आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत झाला आहे. जर इराणी युद्धनौका श्रीलंकेला वळसा घालत कोच्चीला पोहचली असती आणि भारतीय सागरी सीमेत असती तर हा मोठा कुटनितीक वाद झाला असता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...