AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत मंत्री जे. पे. नड्डा आणि CJP शिष्टमंडळाची 10 मिनिटे बैठक, चर्चेत नेमकं काय घडलं?

दिल्लीत मंत्री जे. पे. नड्डा आणि CJP शिष्टमंडळाची 10 मिनिटे बैठक, चर्चेत नेमकं काय घडलं?

| Updated on: Jul 20, 2026 | 3:36 PM
Share

दिल्लीत जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु होते. हजारो लोक या आंदोलनात सहभागी झाले होते. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत होते. नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार, अभिजीत दीपके यांनी उपोषण सोडले आहे. तर दुसरीकडे, CJP चे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी संपर्क साधला होता.

दिल्लीत जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु होते. हजारो लोक या आंदोलनात सहभागी झाले होते. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत होते. नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार, अभिजीत दीपके यांनी उपोषण सोडले आहे. तर दुसरीकडे, CJP चे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी संपर्क साधला होता. ते केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट केले होते. याभेटी बाबत आता मोठी अपडेट समोर याली आहे.

सीजेपीने ट्विटर (X) वर पोस्ट करत सागंतिले आहे की, दोन तसा वाट पाहिल्यानंतर त्यांना मंत्री जे. पी नड्डा यांची भेट घेता आली. महत्त्वाचं म्हणजे, यानंतर 10 मिनटांतच चर्चा संपवण्यात आली. याआधीही सीजेपीने ट्विटद्वारे “शिक्षण मंत्र्यांच्या राजिनाम्यासाठी आरोग्य मंत्री घेणार” अशी सरकर वर टीका केली होती.

आज कॉकरोच जनता पार्टीने (CJP) संसदेकडे मोर्चा काढला होता. मात्र दिल्ली पोलिसांनी यासाठी परवानगी नाकारली आहे. तरीही जंतर-मंतर येथे सुमारे १० हजारांवर कार्यकर्ते जमले. पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला होता. संसदेकडे मोर्चा काढण्यासाठी आंदोलकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ जंतर-मंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Published on: Jul 20, 2026 03:36 PM

Follow Us