पुजाराच्या बॅटिंगची ताकत, 153/7 वरुन 403/7 पर्यंत पोहोचला स्कोर, 4 दिवसाची मॅच एका दिवसात संपवली

| Updated on: Dec 07, 2022 | 5:52 PM

समोरची टीम एकाच दिवसात दोनवेळा ऑलआऊट

पुजाराच्या बॅटिंगची ताकत, 153/7 वरुन 403/7 पर्यंत पोहोचला स्कोर, 4 दिवसाची मॅच एका दिवसात संपवली
Cricket
Follow us on

नवी दिल्ली: रोमांचक सामने फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच होत नाहीत, तर देशांतर्गत क्रिकेटमध्येही असे सामने होतात. विजय मर्चेंट ट्रॉफीमध्ये असाच एक सामना पहायला मिळाला. गुजरात आणि मेघालय या दोन टीम्स दरम्यान ही मॅच होती. चार दिवसाचा हा सामना होता. पण या मॅचचा निकाल एक दिवसात लागला. गुजरातच्या टीमने मेघालयवर विजय मिळवला. हा विजय साधासुधा नाहीय. एक इनिंग आणि 316 धावांच्या मोठ्या फरकाने हा विजय मिळवला. या विजयात गुजरातच्या 8 व्या आणि 9 व्या नंबरच्या फलंदाजाने महत्त्वाची भूमिका बजावली.

सातव्या-आठव्या नंबरच्या फलंदाजाची कमाल

गुजरातने पहिली बॅटिंग केली. त्यांच्या 157 धावांवर 7 विकेट गेल्या होत्या. टीमची धावसंख्या 200 पर्यंत पोहोचणही कठीण दिसत होतं. त्यावेळी 8 व्या नंबरचा फलंदाज पूरव पुजारा आणि 9 व्या नंबरचा फलंदाज खिलान पटेल यांची जोडी जमली. परिणामी गुजरातने 7 विकेटवर 403 धावा करुन डाव घोषित केला. 48.3 ओव्हर्समध्ये त्यांनी या धावा बनवल्या.

8 व्या विकेटसाठी नाबाद 250 धावांची भागीदारी

पुजारा आणि पटेलने 8 व्या विकेटसाठी 153 चेंडूत नाबाद 250 धावांची भागीदारी केली. पुजाराने 93 चेंडूत 132 धावा फटकावल्या. यात 18 चौकार आणि 3 षटकार आहेत. पटेलने 79 चेंडूत नाबाद 130 धावा चोपल्या. यात 22 चौकार आणि 3 षटकार आहेत.


एकाच दिवसात गुजरातने कसा मिळवला मोठा विजय?

मेघालयसमोर डोंगराऐवढ्या 403 धावा पार करण्याचं आव्हान होतं. पण मेघालयची टीम काही तासात दोनवेळा ऑलआऊट झाली. मेघालयचा पहिला डाव 20.3 ओव्हर्समध्ये 37 धावात आटोपला. दुसऱ्या इनिंगमध्ये 18.2 षटकात 50 रन्समध्ये टीम ऑलआऊट झाली. दोन्ही इनिंगमध्ये मिळून मेघालयच्या टीमने 38.5 ओव्हर्समध्ये 87 धावा केल्या. त्यामुळे गुजरातच्या टीमने मोठा विजय मिळवला. विजय मर्चेंट ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी एक डाव आणि 316 धावांनी मोठा विजय मिळवला.