PBKS vs MI Live Score Updates, IPL 2026 : जबरदस्त, पंजाबला 8 बॉलमध्ये तिसरा झटका, कूपर कोनोली आऊट
Punjab Kings vs Mumbai Indians Indian Premier League 2026 Live Score Updates : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामना हा धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे.

LIVE Cricket Score & Updates
-
PBKS vs MI Live Score Updates : जबरदस्त, पंजाबला 8 बॉलमध्ये तिसरा झटका, कूपर कोनोली आऊट
मुंबई इंडियन्सने जबरदस्त कमबॅक केलं आहे. शार्दूलने पंजाबला डावातील 12 व्या ओव्हरमध्ये 2 झटके दिले. शार्दूलने प्रभसिमर सिंह आणि श्रेयस अय्यर या दोघांना आऊट केलं. त्यानंतर राज अंगद बावा याने कूपर कोनोली याला आऊट केलं. यासह मुंबईने पंजाबला 8 बॉलमध्ये 3 झटके देत बॅकफुटवर टाकलं आहे.
-
PBKS vs MI Live Score Updates : शार्दुल ठाकुरची कमाल, पंजाबला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके
शार्दूल ठाकुर याने पंजाबला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके देत मुंबईला कमबॅक करुन दिलं आहे. शार्दूलने सेट प्रभसिमरन सिंह याला आऊट करत पंजाबला दुसरा झटका दिला. त्यानंतर शार्दूलने कॅप्टन श्रेयस अय्यर याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. शार्दुलने पंजाबच्या डावातील 12 व्या ओव्हरमध्ये ही कामगिरी केली.
-
-
PBKS vs MI Live Score Updates : मुंबईला मोठी विकेट, सेट प्रभसिमरन सिंह आऊट, पंजाबला दुसरा धक्का
शार्दूल ठाकुर याने प्रभसिमरन सिंह याला आऊट करत मुंबईला दुसरी विकेट मिळवून दिली आहे. शार्दूलने प्रभसिमरन याला कॉर्बिन बॉश याच्या हाती कॅच आऊट केलं. प्रभसिमरन याने 32 बॉलमध्ये 57 रन्स केल्या.
-
PBKS vs MI Live Score Updates : प्रभसिमरन सिंह याचं अर्धशतक, पंजाबचं शतक, मुंबई विकेटच्या शोधात
पंजाब किंग्सचा ओपनर प्रभसिमरन सिंह याने अर्धशतक पूर्ण केलं आहे. यासह पंजाने यासह 11 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 100 धावा पूर्ण केल्या आहेत. प्रभसिमरन सिंह 51 धावांवर नाबाद खेळत आहेत. तर कूपर कोनोली नाबाद 21 धावा करुन प्रभसिमरन याला साथ देत आहे.
-
PBKS vs MI Live Score Updates : दीपक चाहरकडून पंजाबला पहिला झटका, प्रियांश आर्या आऊट
दीपक चाहर याने पंजाबची प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंह ही सेट आणि सलामी जोडी फोडली आहे. या दोघांनी पंजाबसाठी 51 धावांची भागीदारी केली. मात्र दीपकने सहाव्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर प्रियांश आर्या याला बोल्ड केलं. प्रियांशने 17 बॉलमध्ये 22 रन्स केल्या.
-
-
PBKS vs MI Live Score Updates : पंजाबच्या सलामी जोडीची जबरदस्त सुरुवात, प्रभसिमरन-प्रियांशची फटकेबाजी
पंजाबच्या सलामी जोडीने टीमला जबरदस्त सुरुवात करुन दिली आहे. प्रभसिमरन सिंह आणि प्रियांश आर्या या दोघांनी जोरदार फटकेबाजी करुन पंजाबला 5 ओव्हरनंतर बिनबाद 46 धावांपर्यंत पोहचवलं आहे.
-
PBKS vs MI Live Updates : सामन्याला सुरुवात, पंजाबची बॅटिंग, प्रभसिमरन-प्रियांश सलामी जोडी मैदानात
पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडिनयन्स सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबईने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. पंजाबकडून प्रभसिमरन सिंह आणि प्रियांश आर्या सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
PBKS vs MI Live Updates : मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, विल जॅक्स, राज बावा, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह (कॅप्टन) आणि रघु शर्मा.
-
PBKS vs MI Live Updates : पंजाब प्लेइंग ईलेव्हन
पंजाब प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यांश शेडगे, शशांक सिंग, अझमतुल्ला ओमरझई, मार्को यान्सेन, झेव्हीयर बार्टलेट, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
-
PBKS vs MI Live Updates : मुंबईने टॉस जिंकला, पंजाब विरुद्ध निर्णय काय?
मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्स विरुद्ध टॉस जिंकला आहे. हंगामी कर्णधार जसप्रीत बुमराह याने पंजाब विरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईने पंजाब विरुद्ध 2 बदल केले आहेत. तर पंजाबने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत.
-
PBKS vs MI Live Updates : मुंबई इंडियन्स टीम
रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार) रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, विल जॅक्स, राज बावा, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर, ट्रेंट बोल्ट, रघु शर्मा, मयंक रावत, रॉबिन मिन्झ, शार्दुल ठाकूर, क्विंटन डी कॉक, हार्दिक पंड्या, केशव महाराज, अश्वनी कुमार,मयंक मार्कंडे, शेरफेन रूदरफोर्ड, दानिश मलेवार, क्रिश भगत आणि मोहम्मद सलाहुद्दीन इझार.
-
PBKS vs MI Live Updates : पंजाब किंग्स टीम
पंजाब किंग्स टीम : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, कूपर कोनोली, मार्कस स्टॉयनिस, सुर्यांश शेडगे, शशांक सिंग, मार्को यान्सेन, बेन द्वारशुईस, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, हरप्रीत ब्रार, यश ठाकूर, झेवियर बार्टलेट, विष्णू विनोद, प्रवीण दुबे, विजयकुमार वैशाख, लॉकी फर्ग्युसन, अझमतुल्ला उमरझाई, नेहल वढेरा, मिशेल ओवेन, हरनूर सिंग, मुशीर खान, पायला अविनाश आणि विशाल निषाद.
-
PBKS vs MI Live Updates : पंजाबसमोर मुंबईचं आव्हान, कोण जिंकणार?
पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याचं आयोजन हे धर्मशालेतील एचपीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील 12 वा सामना आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.
आयपीएल 2026 स्पर्धेत प्लेऑफसाठी चुरस आहे. पंजाब किंग्स आपल्या मोहिमेतील पहिल्या 7 पैकी 6 सामने जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये टॉपला होती. मात्र त्यानंतर पंजाबला उतरण लागली. पंजाबने सलग 4 सामने गमावले. त्यानंतर आता पंजाब आपल्या मोहिमेतील 12 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध 2 हात करत आहे. मुंबई इंडियन्सचाही हा 12 वा सामना आहे. मुंबईचं प्लेऑफमधून आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे मुंबई प्रतिष्ठेसाठी खेळत आहे. मात्र पंजाबसाठी हा सामना प्लेऑफच्या समीकरणातून अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे पंजाबसाठी एका अर्थाने हा सामना करो या मरो असाच आहे. या निमित्ताने सामन्यातील प्रत्येक अपडेट्स लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.