IND vs SA: क्विंटन डि कॉक की एमएस धोनी? पंतच्या स्टम्पिंगचा हा VIDEO पाहून तुम्हाला धोनी आठवेल

| Updated on: Jan 20, 2022 | 3:57 PM

पार्ल: यष्टीपाठी विकेटकिपिंग करणं मोठं कौशल्य आहे. सामन्याच्या निकालात विकेटकिपरची भूमिका महत्त्वाची असते. झेल, रनआऊट आणि स्टम्पिंग सामन्याचा निकाल बदलू शकतात. काल पहिल्या वनडे मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डि कॉकने (Quinton de Kock) यष्टीपाठी विकेटकिपिंग असचं जबरदस्त कौशल्य दाखवलं. ज्यामुळे सोशल मीडियाला महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) आठवण झाली. सामन्याच्या एक महत्त्वाच्या टप्प्यावर डि कॉकने आंदिले […]

IND vs SA: क्विंटन डि कॉक की एमएस धोनी? पंतच्या स्टम्पिंगचा हा VIDEO पाहून तुम्हाला धोनी आठवेल
Follow us on

पार्ल: यष्टीपाठी विकेटकिपिंग करणं मोठं कौशल्य आहे. सामन्याच्या निकालात विकेटकिपरची भूमिका महत्त्वाची असते. झेल, रनआऊट आणि स्टम्पिंग सामन्याचा निकाल बदलू शकतात. काल पहिल्या वनडे मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डि कॉकने (Quinton de Kock) यष्टीपाठी विकेटकिपिंग असचं जबरदस्त कौशल्य दाखवलं. ज्यामुळे सोशल मीडियाला महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) आठवण झाली. सामन्याच्या एक महत्त्वाच्या टप्प्यावर डि कॉकने आंदिले फेलुकवायोच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतचं (Rishabh Pant) जबरदस्त स्टम्पिंग केलं.

अनेकांची मन जिंकून घेतली

या स्टम्पिंगचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. सार्वकालिन 10 सर्वोत्तम स्टम्पिंग काढायचे म्हटले तर, त्यात एमएस धोनीचेच पाच स्टम्पिंग असतील. धोनीने त्याच्या क्रिकेट करीयरमध्ये विकेटकिपिंगच असं अदभूत कौशल्य दाखवलं आहे. काल डि कॉकने पंतचं स्टम्पिंग केलं, तेव्हा अनेकांना धोनीची आठवण झाली. ऋषभ प्रमाणे डि कॉक सुद्धा उत्तम फलंदाज आहे. पहिल्या वनडेमध्ये त्याला अपेक्षित फलंदाजी करता आली नाही. पण त्याने पंतचं अप्रतिम स्टम्पिंग करुन अनेकांची मन जिंकून घेतली.

सेकंदभरासाठी पंत क्रिजच्या बाहेर गेला

फक्त सेकंदभरासाठी पंत क्रिजच्या बाहेर गेला होता. तितक्यात डि कॉकने आपलं काम करुन घेतलं. अत्यंत चपळाईने क्षणाचाही विलंब न लावता त्याने बेल्स उडवल्या. ऋषभ पंत एकहाती सामना फिरवू शकतो. तिसऱ्या केपटाऊन कसोटीत त्याने त्याच्या बॅटचा तडाखा दाखवला आहे. त्यामुळे पंतचा विकेट दक्षिण आफ्रिकेसाठी खूप महत्त्वाचा होता. पंतने 22 चेंडूत 16 धावा केल्या.

Quinton de Kock or MS Dhoni? SA wicket keepers stumping to dismiss Rishabh Pant impresses Twitter