अबब, Rahul dravid च्या मुलासोबत क्रिकेट खेळणाऱ्या मुलाने ठोकल्या 404 धावा, मुंबईच्या गोलंदाजांना धुतलं

राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविडच्या फलंदाजीबद्दल तुम्ही ऐकल असेल. यावेळी समित द्रविडसोबत खेळणाऱ्या मुलाने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने मैदानात धावांचा पाऊस पाडला. पण त्याचवेळी राहुल द्रविड यांचा मुलगा समितने या मॅचमध्ये किती धावा केल्या?

अबब, Rahul dravid च्या मुलासोबत क्रिकेट खेळणाऱ्या मुलाने ठोकल्या 404 धावा, मुंबईच्या गोलंदाजांना धुतलं
prakhar chaturvedi
Image Credit source: BCCI
| Updated on: Jan 16, 2024 | 9:11 AM

नवी दिल्ली : असं म्हणतात, जसा बाप, तसा मुलगा. राहुल द्रविड यांची दोन्ही मुलं त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आहेत. पण या मुलांसोबत क्रिकेट खेळणारी मुलं सुद्धा मागे नाहीयत. ते सुद्धा तितकेच माहिर खेळाडू आहेत. राहुल द्रविड यांचा मोठा मुलगा समित द्रविड सोबत क्रिकेट खेळणाऱ्या मुलाने मोठी कामगिरी केली आहे. मुंबई विरुद्ध कूच बेहार ट्रॉफीच्या फायनलमध्ये या मुलाने जबरदस्त प्रदर्शन केलय. समित द्रविडसोबत क्रिकेट खेळणाऱ्या प्रखर चतुर्वेदीने कूच बेहार ट्रॉफीच्या फायनलमध्ये इतिहास रचला. त्याने एकट्याने 400 पेक्षा जास्त धावा केल्या. या टुर्नामेंटच्या इतिहासात आतापर्यंतच्या फायनल मॅचमध्ये 400 प्लस धावा करणारा प्रखर चतुर्वेदी पहिला फलंदाज आहे. त्याने कर्नाटककडून खेळताना मुंबई विरुद्ध हा महारेकॉर्ड केला.

प्रखर चतुर्वेदीने 638 चेंडूचा सामना करताना 404 धावा ठोकल्या. त्याने 49 वेळा चेंडू सीमारेषेपार पाठवला. यात 46 बाऊंड्री आणि तीन सिक्स आहेत. प्रखर चतुर्वेदीने कर्नाटकडून ओपनिंग करताना ही इनिंग खेळली. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. प्रखरने ज्या मॅचमध्ये एकट्याने नाबाद 404 धावा केल्या. त्या मॅचमध्ये राहुल द्रविडच्या मुलाने समितने 46 चेंडूत 22 धावा केल्या. 10 व्या नंबरवर फलंदाजी करणाऱ्या समर्थने 135 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. त्याशिवाय मधल्याफळीत हर्षल धरमानीने शानदार शतक झळकवत 169 धावा केल्या.


अबब, कर्नाटकच्या 890 धावा

या फलंदाजीमुळे मोठ्या आघाडीसह कर्नाटक-मुंबई सामना ड्रॉ झाला. मुंबईने आपल्या पहिल्या डावात 380 धावा केल्या होत्याय. तेच कर्नाटकटने 8 विकेट गमावून 890 धावा केल्या. KSCA स्टेडियममध्ये हा फायनल सामना खेळला गेला.