
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या मुलाची क्रिकेटविश्वात जोरदार चर्चा रंगली आहे. अंडर 19 भारतीय संघात निवड झाल्यानंतर सर्वांच्या नजरा त्याच्या कामगिरीकडे खिळल्या आहे. देशांतर्गत अंडर 19 स्पर्धेत समित द्रविडने चांगली कामगिरी केली आहे. त्याला याच कामगिरीच्या जोरावर संघात निवडलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंडर 19 वर्ल्डकप संघात त्याला स्थान देण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका याच महिन्यात होणार आहे. पहिली वनडे 21 सप्टेंबरला, दुसरी वनडे 23 सप्टेंबरला आणि तिसरी वनडे 26 सप्टेंबरला होणार आहे. तसेच चार दिवसीय पहिला सामना 3 ऑक्टोबरला आमि दुसरा चार दिवसीय सामना 7 ऑक्टोबरला होणार आहे. पण असं असलं तरी अंडर 19 वर्ल्डकप संघात समित द्रविडचं खेळणं कठीण आहे. त्याचं कारणंही तसंच आहे. अंडर 19 वर्ल्डकप 2026 साली होणार आहे. त्या वर्षी समित द्रविड 20 वर्षांचा होईल. त्यामुळे त्याला संघात स्थान मिळणार नाही.
समित द्रविडचा जन्म 10 नोव्हेंबर 2005 साली झाला आहे. 2 सप्टेंबर 2024 रोजी त्याचं वय 18 वर्षे आणि 297 दिवस आहे. याच वर्षी 10 नोव्हेंबरला समित 19 वर्षांचा होईल. 19 वर्षांचा झाली की तो अंडर 19 वर्ल्डकप असो की स्पर्धा त्यात खेळू शकणार नाही. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याला घेण्याचं कारण असं की, ही मालिका 10 नोव्हेंबरच्या आत संपणार आहे. वनडे मालिकेतील तिन्ही सामने 26 सप्टेंबरला संपतील. तर चार दिवसीय सामने 10 ऑक्टोबरला संपेल. त्यामुळे अंडर संघात समित द्रविडला खेळण्याची ही शेवटची संधी आहे.
वनडे मालिकेसाठी संघ : रुद्र पटेल (उपकर्णधार), साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमान (कर्णधार), किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंश सिंह पंगालिया (विकेटकीपर), समित द्रविड़, युधाजीत गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राजावत, मोहम्मद एनान.
चार दिवसीय मालिकेसाठी संघ: वैभव सूर्यवंशी, नित्या पंड्या, विहान मल्होत्रा (उपकर्णधार), सोहम पटवर्धन (कर्णधार), कार्तिकेय केपी, समित द्रविड़, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंश सिंह पंगलिया (विकेटकीपर), चेतन शर्मा, समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंह, आदित्य सिंह, मोहम्मद एनान.