Ranji Trophy 2022: लीग स्टेजची घोषणा, आठ शहरांमध्ये होणार सामने, जाणून घ्या कधी सुरु होणार स्पर्धा

| Updated on: Jan 31, 2022 | 10:02 PM

बीसीसीआयने रणजी स्पर्धेच्या सुधारीत कार्यक्रमाची घोषणा केली आहे. देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे बीसीसीआयला रणजी स्पर्धा स्थगित करावी लागली होती.

1 / 4
रणजी करंडक स्पर्धेची (Ranji Trophy 2022) साखळी फेरी 10 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. बीसीसीआयने रणजी स्पर्धेच्या सुधारीत कार्यक्रमाची घोषणा केली आहे. देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे बीसीसीआयला रणजी स्पर्धा स्थगित करावी लागली होती. आधी 13 जानेवारीला ही स्पर्धा होणार होती.   (PC-PTI)

2 / 4
रणजी करंडक स्पर्धेत 38 संघ सहभागी होणार आहेत. आठ शहरांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाऊ शकते. अहमदाबाद, कोलकाता, त्रिवेंद्रम, कटक, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद आणि राजकोट या शहरांमध्ये रणजी स्पर्धा होईल. (PC-PTI)

3 / 4
बीसीसीआयने रणजी स्पर्धेच्या फॉर्मेटमध्ये बदल केला आहे. आता चार संघांचे आठ ग्रुप असणार आहेत. यात प्लेट समूहातील सहा संघ असणार आहेत. (PC-PTI)

4 / 4
मागच्या सीजनमध्ये रणजी स्पर्धा रद्द झाल्याने देशातंर्गत क्रिकेटपटूंना नुकसानभरपाई देण्यात आली होती. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दोन टप्प्यांमध्ये ही स्पर्धा होईल, अशी घोषणा केली होती. (PC-PTI)