AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB, GT, SRH की RR! कोण मिळवणार जेतेपद? चॅम्पियनशिपबाबत भाकीत वर्तवताना सांगितलं कारण

आयपीएल 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचा खेळ संपला असून आता प्लेऑफच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. आता जेतेपद कोण मिळवणार याची उत्सुकता आहे.

RCB, GT, SRH की RR! कोण मिळवणार जेतेपद? चॅम्पियनशिपबाबत भाकीत वर्तवताना सांगितलं कारण
| Updated on: May 25, 2026 | 3:38 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीत आता फक्त चार संघ आहेत. साखळी फेरीचा थरार संपला असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहे. आता या चार पैकी जेतेपदाला कोण गवसणी घालणार याची उत्सुकता आहे. 31 मे रोजी अंतिम फेरीत चषक कोण उचलणार? याबाबत मनात काहूर उठलं आहे. असं असताना जेतेपदाबाबत आधीच भविष्यवाणी करण्यात आली आहे. हे भाकीत कोणत्या ज्योतिषाने नाही क्रिकेटच्या बापूने वर्तवली आहे. क्रिकेटचा बापू म्हणजेच अक्षर पटेल. त्याला क्रिकेटमध्ये बापू या नावाने ओळखलं जातं. आयपीएल स्पर्धेतून आऊट झाल्यानंतर त्याच्याशी संवाद साधताना जेतेपदाबाबत विचारलं गेलं होतं. तेव्हा त्याने उत्तर दिलं आणि कारणही सांगितलं.

काय म्हणाला अक्षर पटेल?

आयपीएल स्पर्धेतील शेवटचा सामना संपल्यानंतर मुरली कार्तिकने अक्षर पटेलला प्रश्न विचारला की, सर्व चार संघांविरूद्ध खेळला आहे. तुला काय वाटतं? कोणता संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे? तेव्हा अक्षर पटेलने सनरायझर्स हैदराबादचं नाव घेतलं. अक्षर पटेलने फक्त नाव घ्यायचं म्हणून घेतलं नाही तर त्या मागचं कारणही सांगून टाकलं. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद जेतेपद मिळवू शकते असं क्रीडाप्रेमींना वाटू लागलं आहे. अक्षर पटेलने सांगितलं की, टॉप थ्री जेव्हा धावा करतात तेव्हा त्यांना थांबवणं कठीण होतं. अक्षर पटेलने व्यक्त केलेल्या भाकीताला आकडेवारीचीही साथ मिळते. त्यामुळे त्याने वर्तवलेल्या भाकीताची सोशल मीडियावर चर्चा आहे.

आयपीएल स्पर्धेत असं एकदाच घडलंय?

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात टॉप 2 संघ जेतेपदापासून दूर राहिले आहेत. तसेच एलिमिनेटर फेरीतील संघाने जेतेपद मिळवलं आहे. हा संघ दुसरा तिसरा कोणी नाही तर सनरायझर्स हैदराबाद आहे. ऑरेंज आर्मीने डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात ही कामगिरी केली होती. 2016 साली जेतेपदाला गवसणी घातली होती. आता दहा वर्षानंतर सनरायझर्स हैदराबाद त्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? असा प्रश्न आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वात जेतेपद मिळवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आता हैदराबादला दोन विजय मिळवून अंतिम फेरी गाठायची आहे. प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?